Goa congress
Goa congressDainik Gomanatk

Goa Politics: सासष्टी काँग्रेसचा बालेकिल्ला हा इतिहास!

Goa Politics: आलेक्स सिक्वेरा : तालुक्यात काँग्रेस आमदार आहेतच कुठे?
Published on

Goa Politics: सासष्टी तालुका एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, ही गोष्ट जरी खरी असली तरी आज तो इतिहास झालेला आहे. सासष्टीत एक मतदारसंघ वगळता काँग्रेस आमदार आहेतच कुठे, असा सवाल नुकतेच मंत्रिपद लाभलेल्या आलेक्स सिक्वेरा यांनी केला.

Goa congress
Lok Sabha Election: नरेश सावळ लोकसभा रिंगणात शक्य

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. भाजपला बळकट करण्यासाठी मी सासष्टीत नक्की काम करेन, कारण सासष्टीत भाजपच्या विचारसरणीची आणि भाजपला मानणारी जनता वाढू लागली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तुम्ही मंत्री झाल्यानंतर सासष्टीत भाजपची मते वाढणार का, असे विचारले असता भाजप विस्तारासाठी मी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न

करेन. सासष्टीतील जनता नक्कीच भाजपला बहुमत देईल. याच संदर्भात आमच्याकडे नावेलीचे उदाहरण आहे. नावेलीत कधीही भाजपचा आमदार निवडून आला नव्हता. मात्र, यावेळी तो आला, असे ते म्हणाले.

Goa congress
Goa Mining Case: थकीत वेतन वेळेत न दिल्यास खाण बंद पाडू

गोव्यात येणारे आगामी सरकार प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपचेच असेल, लोकसभा निवडणुकीतही गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकेल, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.

यापूर्वी नुवे मतदारसंघातून बिनविरोध निवडून येण्याची किमया आलेक्स सिक्वेरा यांनी साधली आहे. मंत्रिपदी वर्णी लागली त्यांना आता कोणती खाती मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. त्यांचा शपथविधी झाल्यानंतर नुवे आणि कुडतरी मतदारसंघातील कित्येक ख्रिस्ती कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यात राय येथील स्थानिक नेते अँथनी बार्बोजा आणि रायच्या माजी सरपंच मिंगेलीना डिसोझा यांचा समावेश होता. त्यांनी आलेक्स सिक्वेरा आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत फोटोही काढले.

सासष्टीला दीड वर्षांनी मंत्रिमंडळात स्थान

आलेक्स सिक्वेरा यांना प्रमोद सावंत यांनी मंत्री केल्याने अल्पसंख्याक ख्रिस्ती मतदारांचा प्रभाव असलेल्या सासष्टी तालुक्याला प्रथमच दीड वर्षानंतर प्रतिनिधित्व मिळाले आहे. मागच्या मंत्रिमंडळात सासष्टीतील फिलीप नेरी रॉड्रिग्ज हे मंत्री होते. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून सरकारने अल्पसंख्याकांना चुचकारण्याचा डाव खेळला आहे. मात्र, त्याचा भाजपला लाभ होणार की नाही, आणि सिक्वेरा ख्रिस्ती मते भाजपकडे वळवू शकतील का, हे येणारा काळच स्पष्ट करेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com