कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या नव्या सरपंच, उपसरपंचांची सोमवारी निवड

कुर्टी पंचायतीची निवडणुकीवर नजर
Election
Election Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: जुनच्या पहिल्या आठवड्यात पंचायतीच्या निवडणुका होणार असल्यामुळे आता फोंडा मतदारसंघातील एकमेव कुर्टी - खांडेपार पंचायतीचे निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. या पंचायतीचे सरपंच भिका केरकर व उपसरपंच शर्मिला सांगावकर यांच्याविरुद्धचा अविश्‍वास ठराव नुकताच संमत झाला आहे. आता सोमवार 18 एप्रिल रोजी नवीन सरपंचाची निवड केली जाणार आहे. हा या पंचायत मंडळाचा आठवा सरपंच ठरणार आहे. (Sarpanch and Deputy Sarpanch of Kurti Khandepar Panchayat in Goa to be elected on Monday)

Election
गोव्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला 'आप' आणि 'आरजी'चा पाठिंबा

पाच वर्षांत आठ सरपंच होण्याचा एक आगळा विक्रम या पंचायतीने नोंदविला आहे. कृषिमंत्री रवी नाईक यांचे समर्थक नागझर प्रभागाचे पंच दादी नाईक हे आठवा सरपंच होण्याचे निश्‍चित झाले आहे. यापूर्वीही दादी एका वर्षाकरता सरपंच होते. आता परत एकदा एका महिन्याकरता ते सरपंचपद भूषविणार आहेत. उपसरपंचपदी कोणाची निवड होणार हे निश्‍चीत नसले, तरी फक्त महिनाच राहिल्याने या पदाला विशेष अर्थ राहिलेला नाही. सध्या या मंडळात म.गो.प.चे पाच, भाजपचे चार, तर काँग्रेसचे दोन सदस्य आहेत.

कुर्टी-खांडेपार पंचायत ही फोंडा (Phonda) तालुक्यातील एक महत्त्वाची पंचायत मानली जाते. या पंचायतीत अकरा प्रभाग असून मतदारांची संख्या पंधरा हजाराच्या आसपास आहे. 2017 साली जेव्हा या पंचायतीची निवडणूक झाली होती, तेव्हा रवी नाईक काँग्रेसचे (Congress) आमदार होते. आता ते भाजपचे आमदार व मंत्री आहेत. मागच्या वेळी काँग्रेसचे चार पंच निवडून आले होते, पण त्यातले तीन पंच नंतर म.गो. पक्षात गेल्यामुळे दादी नाईक यांच्या रूपात एकच पंच शिल्लक राहिला होता, पण रवीपुत्र रितेश व रॉय यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर दादींनीही त्यांच्यासमवेत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Election
शुक्रवार ठरला घातवार, गोव्यात अपघातांची मालिका

राजेश वेरेकरांनी काँग्रेस प्रवेश केल्यानंतर त्यांच्या दोन समर्थक पचांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसची शुन्यावर असलेली संख्या दोनवर आली होती. आता ही शेवटची सरपंचाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असून यात रवीपुत्र रॉय नाईक यांचा सिंहाचा वाटा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तरीही ही पंचायत गाजली ती सातत्याने होणाऱ्या संगीत खुर्चीच्या खेळामुळे. सुरवातीला ही पंचायत भाजपकडे होती, नंतर ती मगो पक्षाकडे गेली आणि आता अखेरच्या टप्प्यात ती परत भाजपकडे गेली आहे. आता पंचायत निवडणुकीत ही पंचायत कोणाकडे जाते यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. अनेक इच्छुक बाशिग बाधुन बोहल्यावर उभे राहण्याच्या तयारीला लागले असून आपल्याला समर्थन मिळावे म्हणून ते कृषिमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक तसेच काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर यांच्याशी संपर्क साधताना दिसत आहेत. त्यामुळे या महिन्याभरात या पंचायतीत घडामोडींना वेग येणार असून मतदारांचे लक्ष सरपंचाच्या निवडीऐवजी निवडणुकीतील संभाव्य घडामोडींकडे लागले आहे.

सरकारात भाजप (BJP) मगोची युती असल्यामुळेच उमेदवार ठरविण्यास कृषिमंत्री रवी नाईक हे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. यात शकांच नाही. त्यामुळे युती व काँग्रेस समर्थक याच्यात लढती होण्याचीच सभावना अधिक दिसत आहे. या पंचायत मंडळातही पंचही आपले नशीब परत एकदा आजमवणार आहेत. हे पाहता यावेळची कुर्टी-खांडेपार पंचायतीची निवडणूक रोचक होणार असून नवीन समीकरणे उदयास येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com