गोव्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला 'आप' आणि 'आरजी'चा पाठिंबा

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार विरेश बोरकर यांनीही कर्मचाऱ्यांची भेट घेतली.
AAP and RG support agitation of contract workers in Goa
AAP and RG support agitation of contract workers in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मानसोपचार संस्थेमधील (आयपीएचबी) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्यासाठी पणजीतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या आंदोलनाला शुक्रवारी आम आदमी पक्ष (आप) व रिव्‍होल्युशनरी गोवन्स (आरजी) यांनी पाठिंबा व्यक्त केला. 9 वर्षाच्या सेवेनंतर अचानक कर्मचाऱ्यांना काढून टाकणे हा अन्याय असून कर्मचाऱ्यांच्या या लढ्यात सहभागी होऊन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असा विश्‍वास या पक्षांनी दिला. (AAP and RG support agitation of contract workers in Goa)

AAP and RG support agitation of contract workers in Goa
वनहक्क दावे निकाली काढू! : मुख्यमंत्री

हे कंत्राटी कर्मचारी गेली 9 वर्षे काम करत आहेत. मात्र, अचानक एक महिन्याची नोटीस देऊन त्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्याविरुद्ध या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसने (Congress) काल आंदोलन घटनास्थळी भेट देऊन त्यांचा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊन चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले होते. आपतर्फे वाल्मिकी नाईक यांनी या कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा करताना सांगितले की, आपने पंजाबमध्ये कंत्राटी पद्धतीवरील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले आहे, तर हे भाजप (BJP) सरकार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यास उठले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी पाठिंबा देऊ असे मत व्यक्त केले.

AAP and RG support agitation of contract workers in Goa
गोव्यातील बोकाळलेला भ्रष्टाचार व मंत्र्यांचा हस्तक्षेप

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे (RG) आमदार विरेश बोरकर यांनीही या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. पक्षातर्फे या आंदोलनाला पाठिंबा देऊन जोपर्यंत हा प्रश्‍न सोडविला जात नाही, तोपर्यंत आरजी त्यांच्या पाठिशी राहणार आहे. सरकारी सेवेत नोकरभरती करण्यात येत आहे त्यामध्ये या 28 कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न सोडविणे सरकारला शक्य आहे. अनेकजण 40 वर्षे उलटून गेलेले, तर काहीजण निवृत्तीच्या जवळ पोहचले आहेत. त्यांना या वयात नोकरी मिळणे मुष्किल आहे. त्यांच्या कुटुंबियांचा विचार करून तसेच अंत्योदय तत्त्वावर चालणाऱ्या भाजप सरकारने या गरीब कर्मचाऱ्यांचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली.

या कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न न्यायप्रविष्ट होता. त्यावर न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्यानुसार ही नोकरभरती सुरू आहे. काही राजकीय पक्ष या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्याचे तसेच दिशाभूल करून भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधी पक्षानी या कर्मचाऱ्यांना सत्य बाजू समजावून द्यावी. आरोग्य खात्यातर्फे त्यांच्यावर कोणताच अन्याय केला जात नसून न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार नव्याने भरती सुरू करण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाला आता कोणताच कामधंदा राहिलेला नाही. त्यामुळे विरोधकाची भूमिका बजावताना या कर्मचाऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com