सरकार तुमच्या दारी उपक्रमाचे गरीबांकडे दुर्लक्ष; प्रवीण आर्लेकर

सरकार तुमच्या दारी हा राबवला तो कार्यक्रम कुणासाठी आणि कश्यासाठी होता, गरिबांच्या दारात सरकार आज पर्यंत पोचले नाही. म्हणून पेडणे मतदार संघातील गरीब जनता सरकारच्या नावाने रडत आहे;प्रवीण आर्लेकर
गरीब कुटुंबियांना मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी मोफत गेस सिलिंडर आणि गेस शेगडी वितरीत करताना प्रवीण आर्लेकर
गरीब कुटुंबियांना मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी मोफत गेस सिलिंडर आणि गेस शेगडी वितरीत करताना प्रवीण आर्लेकरDainik Gomantak

मोरजी : निवडणुका (Elaction) जवळ आल्या कि सरकार दारो दरी जाण्याची घोषणा करते त्यातील एक उपक्रम म्हणजे सरकार तुमच्या दारी (Sarkar Tumchya Dari) हा राबवला तो कार्यक्रम कुणासाठी आणि कश्यासाठी होता, गरिबांच्या दारात सरकार आज पर्यंत पोचले नाही. म्हणून पेडणे (Pernem) मतदार संघातील गरीब जनता सरकारच्या नावाने रडत आहे असा दावा मगोचे प्रवीण आर्लेकर (Pravin Arlekar) यांनी कोरगाव पेठेचावाडा येथील मागच्या आठ वर्षापासून अर्धांगवायू या आजाराने अंथरुणावर असलेले रत्नाकर शेट्ये या गरीब कुटुंबियांना मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी मोफत गेस सिलिंडर आणि गेस शेगडी वितरीत 12 रोजी केल्यानंतर ते स्थानिक पत्रकारांकडे बोलत होते.

गरीब कुटुंबियांना मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी मोफत गेस सिलिंडर आणि गेस शेगडी वितरीत करताना प्रवीण आर्लेकर
गोव्यातील रेल्वे दुहेरी ट्रॅकिंग प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांचा विरोध

कोरगाव येथील रत्नाकर शेट्ये या नागरिकाला मागच्या आठ वर्षापासून अर्धांगवायूचा झटका आल्याने ते अंथरुणावर आहेत, त्यामुळे घरकुटुंबियाना बराच आर्थिक तोटा होत आहे. सरकार तुमच्या दरी उपक्रमातून सरकार या गरिबांच्या दारात पोचून त्यांना सोयी सुविधा दिल्या नाही. कोणीतरी मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांच्या लक्षात आणून दिले कि या कुटुंबियांच्या घरात आजपर्यंत शेगडी गॅस नाही. त्यामुळे त्यांना चुलीवर आणि लाकडावर अवलंबून राहावे लागायचे याची दखल घेवून आर्लेकर यांनी त्वरित या सुविधा उपलब्ध करून दिल्या. शिवाय दरवेळी गॅस सिलिंडर भरून देण्याची ग्वाही दिली. यावेळी कोरगाचे माजी सरपंच सुदीप कोरगावकर, सुनील शेट्ये, जयेश पालयेकर, नरेश कोरगावकर, श्री म्हापसेकर, सौ उज्वला आदी उपस्थित होते.

गरीब कुटुंबियांना मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी मोफत गेस सिलिंडर आणि गेस शेगडी वितरीत करताना प्रवीण आर्लेकर
वादग्रस्त भूमिपुत्र विधेयकावरून पुन्हा गोवा विधानसभा गाजण्याची शक्यता

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे या कुटुंबीयावर दुर्लक्ष झाल्याने प्रवीण आर्लेकर यांनी नाराजी व्यक्त करून आपण जर आमदार झालो तर सर्व गरिबांच्या योजना गरिबांच्या दारात पोचवणार असल्याचे सांगितले. आपण कधी कुणाला खोटे आश्वासन देणार नाही तर कृती करून दाखविण असे सांगितले.

माजी सरपंच सुदीप कोरगावकर यांनी बोलताना आता पर्यंत निवडून आलेल्या लोकप्रतीनिधीनी गरीबांना कोणत्याच सोयी सुविधा पुरवल्या नाहीत. प्रवीण आर्लेकर यांनी केवळ कुणाला शब्द दिला तर तो पाळण्याची ताकत त्यांच्यात असल्याने ते आमदार म्हणून निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.

सुनील शेट्ये यांनी प्रतिक्रिया देताना मागच्या आठवड्यात प्रवीण आर्लेकर यांच्या कानावर या गरीब कुटुंबियांची कैफियत मांडली होती. लगेच कुटुंबियांची भेट घेवून त्यांनी या कुटुंबियाना आधार दिल्याबद्दल समाधान व्यक्त करून असे नेतेच खऱ्या अर्थाने गरिबांचे कैवारी ठरत असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com