Sara Ali Khan Goa Vacation: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान हीने गेल्या काही वर्षात स्वतःची स्वतंत्र ओळख बनवली आहे.
दरम्यान, नुकतीच सारा गोव्यात येऊन गेली. तिच्या या गोवा व्हेकेशनमध्ये ती गोव्यातील ज्या हॉटेलमध्ये राहिली होती, तेथील तिचे फोटोज आणि त्या हॉटेलच्या एका रात्रीचे भाडे किती आहे, ते समोर आले आहे.
गोव्यातील वागातोर येथील केफी व्हिला येथे सारा राहत होती. या हॉटेलच्या रूमचे एका रात्रीचे भाडे 42,984 रुपये इतके आहे.
सारा अली खान गोव्यात सुट्टीसाठी आली आणि तिने वागातोर येथील हॉटेलमध्ये वास्तव्य केले. या हॉटेलचा परिसरा खूप सुंदर आहे. येथे खूप शांतता आहे आणि हिरवाईचा आनंदही घेता येतो. सारा अली खानने तिचे येथील फोटोज देखील शेअर केले आहेत.
केफी व्हिला असे या हॉटेलचे नाव आहे. हे हॉटेल पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. वागतोर मेन रोडवरच हे हॉटेल आहे. तसेच समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या गर्दीपासून दूर शांततेच्या ठिकाणी हे हॉटेल आहे.
सारा येथे 2 रात्री आणि 3 दिवस थांबली होती. सारा जेव्हा जेव्हा गोव्याला येते तेव्हा ती राहण्यासाठी केफी व्हिलाचीच निवड करते.
साराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये हॉटेलचा स्विमिंग पूलही दिसतो. हा पूल खूप मोठा आहे. या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे जरी 43,000 रुपये असले तरी त्यात हॉटेलद्वारे अनेक लक्झरी सुविधाही पुरविल्या जातात.
या हॉटेलमध्ये पाऊल ठेवताच तुम्हाला परदेशात आल्यासारखे वाटेल. येथील सजावटही अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आली आहे. Kefi Villas च्या प्रत्येक कोपरा लक्षवेधून घेणारा आहे. येथे बैठकीची एक मोठी स्पेस आहे त्याची सजावटदेखील सुंदररित्या करण्यात आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.