Pollution: प्रदूषणकारी प्रकल्पामुळे सावर्डेवासीय त्रस्त

सावर्डे पंचायतीचे दुर्लक्ष : प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काणाडोळा
Polluting projects
Polluting projectsDainik Gomantak
Published on
Updated on

सावर्डे मतदार संघात बेकायदेशीर कामांना ऊत आला आहे. सांतोण येथे राजकीय आशीर्वादाने सुरू असलेल्या एका हॉटमिक्स प्रकल्पाविरोधात गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सावर्डे पंचायतीकडे तक्रार करूनही तो प्रदूषणकारी प्रकल्प बंद करणे सरकारला शक्य न झाल्याने आता ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

पंचायतीकडून कोणतेही कायदेशीर दाखले न घेता लोकांची मुस्कटदाबी करून हा प्लांट चालवला जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली. गेल्या पाच महिन्यांपासून सांतोण येथे एक हॉटमिक्स प्रकल्प आणि एक खडी क्रशर सुरू केला आहे.

या दोन्ही प्रकल्पांना कोणत्याही स्वरूपाचे दाखले प्राप्त झालेले नाहीत. दिवस-रात्र चालणारे हे प्रकल्प स्थानिक लोकांसाठी डोकेदुखी बनले आहेत. या प्लांटमधून उडणाऱ्या काळ्या भुकटीमुळे लोकांना गंभीर आजार होण्याची भीती सतावतेय.

जे लोक या प्रकल्पाविरोधात आवाज उठवतात, त्यांना एक तर पैसे देऊन किंवा दादागिरी करून गप्प केले जाते. सांतोण आणि आंबेउदक या दोन्ही गावांतील लोक सध्या दहशतीखाली वावरत आहेत.

Polluting projects
Baga Beach Fire: बागा बीचवरील नाईट क्लबमध्ये आग; पार्टी करणाऱ्यांमध्ये उडाला गोंधळ

विहिरीचे पाणीही प्रदूषित

प्रीती देसाई यांनी आपल्या विहिरीतील पाणी काढून दाखवले. तेही काळ्या भुकटीमुळे प्रदूषित झाल्याने आम्ही जगावे तरी कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दिवस-रात्र चालणाऱ्या या प्रदूषणकारी प्रकल्पामुळे आमच्या गावाला ग्रहण लागल्याचे त्यांनी सांगितले. जर सरकारने यावर कारवाई न केल्यास आम्ही गप्प राहाणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Polluting projects
Religious Tradition: देवीचे होमकुंडातून ‘अग्निदिव्य’

तक्रारदारांना पैसे देण्याचा प्रयत्न

येथील रहिवासी प्रीती देसाई ‘गोमन्तक’शी संवाद साधताना म्हणाल्या, धुळीमुळे आमचे घर भरून गेले आहे. श्वास घेणेही कठीण झाले आहे. दिवसभर घर स्वच्छ करावे लागते. कोणालाच आमचे पडून गेलेले नाही.

मी विरोध केला म्हणून आलिशान गाड्या घेऊन बरेचजण आमच्या घरी आले होते. मला पैसे देऊन गप्प करण्याचा प्रयत्न केला; पण मी भूलथापांना बळी पडले नाही. त्या सर्वांना हाकलून लावले, अशी माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com