Religious Tradition: देवीचे होमकुंडातून ‘अग्निदिव्य’

पिळगाव कळसोत्सवाची सांगता : गुढीपाडव्यादिवशी प्रारंभ
Religious Tradition
Religious TraditionDainik Gomantak

अग्निदिव्य आदी पारंपरिक कार्यक्रम आणि शेकडो भक्तगणांच्या साक्षीत पिळगावची ग्रामदेवता श्री शांतादुर्गा देवीचा वार्षिक कळस उत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला. तीन दिवस साजरा झालेल्या कळसोत्सवाची आज (शनिवारी) पहाटे सांगता झाली.

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी कळसोत्सवाला प्रारंभ झाला होता. तीन दिवस श्री देवी शांतादुर्गेचा कळस घरोघरी नेण्यात आला. गावकर मंडळी कळस घेऊन ग्रामस्थांच्या घरात गेल्यानंतर प्रत्येक घरात कळसाचे विधीवत पूजन आदी सेवा करण्यात आली. सुवासिनींतर्फे देवीची ओटी भरण्यात आली.

पूर्वीच्या काळी गुढीपाडव्याच्या दिवशीच हा कळस उत्सव साजरा करण्यात येत असे. मात्र, लोकवस्ती वाढल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हा उत्सव तीन दिवस साजरा करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.24) गिमोणे येथील प्रभू रामचंद्र मंदिर, पांडवकालीन चंद्र-सूर्य (चांद, सूर्य) प्रतिमा कोरलेल्या पाषाणावर विधीवत पूजन झाल्यानंतर रात्री उशिरा पारंपरिक वाटेने कलशाचे मंदिरापाशी आगमन झाले.

Religious Tradition
Congress: आधार-पॅन लिंकसाठी पैसे उकळणे थांबवा!

आबालवृद्धांची गर्दी

मध्यरात्री दीड वाजता पारंपरिक पद्धतीने होमकुंड पेटविण्यात आले. नंतर व्रतस्थ धोंड भक्तगण पवित्र तळीवर शुचिर्भूत होऊन आल्यानंतर मध्यरात्री 3 वाजता होमकुंड उत्सव साजरा करण्यात आला.

भक्तगणांसह देवीच्या कलशधारी अवसारी मोडाने नाचत अग्निदिव्य केल्यानंतर पारंपरिक पद्धतीने या उत्सवाची सांगता झाली. नंतर दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. अग्निदिव्याची अनुभूती घेण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com