गेल्या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेने 301 कोटींचा नफा मिळवला होता. दरम्यान, कोकण रेल्वेतील तब्बल 190 पदांसाठी नोकर भरतीची नोटीस लवकरच काढण्यात येणार अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष झा यांनी दिली आहे. याशिवाय, त्यांनी गोव्यातील ओल्ड गोवा आणि पेडणे येथील बोगद्यांच्या कामासाठी 1486 कोटी मंजूर करण्यात आल्याचे देखील झा यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेने स्पर्धात्मक निविदांच्या माध्यमातून तब्बल 1200 कोटींहून अधिक किमतीचे नवीन प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. कोकण रेल्वेने (Konkan Railway) आता 2023-24 या वर्षात सर्वाधिक तब्बल 301 कोटींचा नफा कमावला. याशिवाय, त्यांनी 190 पदांसाठीच्या भरतीची नोटीस लवकरच जारी करण्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. रेल्वे मंत्रालयाने प्लॅन हेड 61 पीएसयू अंतर्गत ओल्ड गोवा (Old Goa) आणि पेडणे बोगद्यांच्या बांधकामासाठी 1486 कोटी मंजूर केले आहेत.
दुसरीकडे, कोकण रेल्वेने स्टेशनवरील सौरउर्जा संयंत्रांनी जानेवारी ते जुलै 2024 पर्यंत 3.18 लाख युनिट वीज निर्माण केली, यामुळे वीज बिलांमध्ये 38.57 लाखांची बचत झाली.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आणि रेल्वे परिसरातून तब्बल 26 बेपत्ता मुलांची सुटका करण्यात आली. याशिवाय, सुरक्षितरित्या त्यांच्या पालकांना किंवा चाइल्ड हेल्पलाईनकडे सुपूर्द करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.