Saint Francis Xavier Exposition: साखळी टू ओल्ड गोवा! शवप्रदर्शन सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बससेवा सुरु

Sanqulim to Old Goa Bus Services: 5 जानेवारी 2025 पर्यंत साखळी ते ओल्ड गोवा तसेच ओल्ड गोव्याहून पुन्हा साखळीला येण्यासाठी या सेवेचा वापर केला जाऊ शकतो.
Sanqulim to Old Goa Bus Services: 5 जानेवारी 2025 पर्यंत साखळी ते ओल्ड गोवा तसेच ओल्ड गोव्याहून पुन्हा साखळीला येण्यासाठी या सेवेचा वापर केला जाऊ शकतो.
Saint Francis Xavier ExpositionDainik Gomantak
Published on
Updated on

ओल्ड गोवा: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवप्रदर्शनासाठी साखळी येथून वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. या व्यवस्थेचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. रविवारी (दि. १ डिसेंबर) रोजी सुरु झालेली ही वाहतूक व्यवस्था साखळी ते ओल्ड गोवा असा प्रवास करेल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, साखळीचे फादर तसेच ओल्ड गोव्याचे फादर पेट्रिशिया उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी नवीन बस सेवेचे उद्घाटन केल्यानंतर सर्व उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित लोकांना संबोधित करताना त्यांनी साखळी तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना ओल्ड गोव्यातील शवप्रदर्शन सोहळ्याला जाण्यासाठी या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

Sanqulim to Old Goa Bus Services: 5 जानेवारी 2025 पर्यंत साखळी ते ओल्ड गोवा तसेच ओल्ड गोव्याहून पुन्हा साखळीला येण्यासाठी या सेवेचा वापर केला जाऊ शकतो.
Saint Francis Xavier Exposition: सायबाच्या भक्तांची प्रतीक्षा संपेना; पाकिस्तानी यात्रेकरूंची गोवा भेट आठवडाभर लांबली

साखळीतील सामाजिक कार्यकर्ता निल, फादर आणि फादर पेट्रिशिया याचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आणि या वाहतूक व्यवस्थेच्या आखणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांशी इच्छुकांनी संवाद साधावा अशी माहिती दिली. ५ जानेवारी २०२५ पर्यंत साखळी ते ओल्ड गोवा तसेच ओल्ड गोव्याहून पुन्हा साखळीला येण्यासाठी या सेवेचा वापर केला जाऊ शकतो.

फादर पेट्रिशिया यांनी देखील मुख्यमंत्र्यांनी ही नवीन वाहतूक व्यवस्था सुरु करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. शवप्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने गोव्यातील इतर कुठल्याही शहरामधून असा उपक्रम राबलेला नाही मात्र साखळीत मुख्यमंत्र्यांनी हे नवीन पाऊल उचलल्यामुळे फादर पेट्रिशिया यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com