Saint Francis Xavier Exposition: सायबाच्या भक्तांची प्रतीक्षा संपेना; पाकिस्तानी यात्रेकरूंची गोवा भेट आठवडाभर लांबली

Pakistani Goa Visit For Exposition Ceremony: इस्लामाबादमध्ये पीटीआय समर्थकांकडून सुरू असलेल्या निषेधामुळे पाकिस्तानी भाविकांचं येणं लांबणीवर पडलं आहे
Pakistani Goa Visit For Exposition Ceremony: इस्लामाबादमध्ये पीटीआय समर्थकांकडून सुरू असलेल्या निषेधामुळे पाकिस्तानी भाविकांचं येणं लांबणीवर पडलं आहे
Pakistani Goa Visit Dainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Pilgrims in Goa for exposition 2024

तिसवाडी, ता. ३० (प्रतिनिधी) : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र शव प्रदर्शनाला हजर राहण्यास उत्सुक असलेल्या पाकिस्तानमधील भाविकांना गोव्यात येण्याची संधी मिळाल होती. इस्लामाबादमधील उच्चायुक्तांनी त्यांचा व्हिसा मंजूर केल्यामुळे किमान 170 पाकिस्तानस्थित गोमंतकीय गोव्यात येण्याची शक्यता वर्तवली जात होती. शवप्रदर्शनासाठी पाकिस्तानी गोमंतकीय भाविकांची पहिली तुकडी 3 डिसेंबर रोजी राज्यात पोहोचणार होती; पण आता इस्लामाबादमध्ये पीटीआय समर्थकांकडून सुरू असलेल्या निषेधामुळे त्यांचे येणं लांबणीवर पडलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानमधील गोमंतकीय शवप्रदर्शनाच्या निमित्ताने गोव्यात परत येणार म्हणून त्यांच्या राहण्याची तरतूद केली गेली होती.

Pakistani Goa Visit For Exposition Ceremony: इस्लामाबादमध्ये पीटीआय समर्थकांकडून सुरू असलेल्या निषेधामुळे पाकिस्तानी भाविकांचं येणं लांबणीवर पडलं आहे
Saint Francis Xavier Exposition: गोंयचो सायब पावलो!! पाकिस्तानी भाविकांचा गोव्यात येण्याचा मार्ग मोकळा; व्हिसा मंजूर

मात्र आता त्यांचं येणं पुढील आठवड्यापर्यंत राखडलं गेल्याची माहिती कराची-पाकिस्तानमधील गोमंतकीय भाविक संघटनेचे समन्वयक पीटर मेंडिस यांनी दिली आहे आणि यामुळे पाकिस्तानमधून येणाऱ्या भाविकांच्या प्रतीक्षेत भर पडली आहे.

पाकिस्तानच्या कराची शहरात मोठ्या संख्येत गोमंतकीय ख्रिस्ती समुदाय असून सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या फेस्त आणि शवप्रदर्शनाला येण्याचा त्यांचा वारसा आहे. नेहमीप्रमाणे यंदा देखील 3 डिसेंबर रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या फेस्ताच्या पूर्वी गोव्यात येण्यासाठी ते सज्ज होते पण शेवटच्या क्षणी अडचण निर्माण झाल्याने आता पुढील आठवड्यात हे भाविक गोव्यात पोहोचणार आहेत.

जुने गोवेत गर्दी

सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे फेस्त येत्या मंगळवार, 3 डिसेंबर रोजी साजरे केले जाणार असल्याने भाविकांची गर्दी वाढली आहे. यंदा फेस्त आणि शवप्रदर्शन एकत्र होणार असल्याने भाविकांच्या गर्दीत लक्षणीय वाढ अपेक्षित असून त्या अनुषंगाने तयारी करण्यात आली आहे. त्याशिवाय जुने गोवेला येणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर वाहतूक वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com