Sanquelim Municipal Council Election 2023: साखळीत मुख्यमंत्र्यांनी केली कार्यकर्त्यांशी चर्चा

कालावधी कमी असल्याने समर्थकांची धावपळ
Municipality of Sanquelim
Municipality of SanquelimDainik Gomantak
Published on
Updated on

Sanquelim Municipal Council Election 2023: साखळी नगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली आणि साखळीतील राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेचा काळ कमी ठेवल्याने सर्वांचीच धावपळ सुरू झाली आहे.

पालिकेत प्रमुख असलेल्या भाजप गट आणि ‘टुगेदर फॉर साखळी’ यांच्यात ही निवडणूक रंगणार आहे. निवडणूक या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची असल्याने मुख्यमंत्री डाॅ.प्रमोद सावंत यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

Municipality of Sanquelim
Goa Electricity Department : ग्राहकांना वीज खात्याचा शॉक, महिन्याचं बिल एवढ्या टक्क्यांनी वाढणार

ही निवडणूक ‘टुगेदर फॉर साखळी’ साठी सत्ता टिकवण्यासाठी तर भाजपसाठी सत्ता मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

या निवडणूक प्रक्रियेतील प्रभाग फेररचना व आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर करण्याची घाई का केली, ते समजत नाही आणि या संपूर्ण प्रक्रियेसाठी जेमतेम 25 दिवस कलावधी देण्यात आला आहे. हे अन्यायकारक आहे.

पालिकेचा कार्रकाळ 24 मे पर्यंत आहे. त्यामुळे निवडणुका एप्रिल च्या तिसऱ्या सप्ताहातही घेता आल्या असत्या. पण तसे न करता आयोगाने घाई दाखवली याचे कारण अस्पष्ट आहे, असेही ब्लेगन म्हणाले.

Municipality of Sanquelim
Goa MLA In Jammu and Kashmir: मंत्र्यांचे जम्मू-काश्मीरात देवीला साकडे! जनकल्याणाची प्रार्थना

भाजप कार्यकर्ते, नेते सक्रिय

साखळी मतदारसंघात व नगरपालिका क्षेत्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विकासकामांचा आधार घेत तसेच भविष्यातील विकासाचा आराखडा लोकांसमोर ठेवून या निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

आतापर्यंत सर्व उमेदवार निश्चित झालेले आहेत. सर्व प्रभागांमधील उमेदवार निश्‍चित झालेले आहेत. यावेळी साखळीत निश्चितपणे भाजपचीच सत्ता स्थापन होणार आहे. उमेदवारांची यादी लवकरच मुख्यमंत्री जाहीर करतील, असे नगरसेवक दयानंद बोर्येकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com