Goa Electricity Department : ग्राहकांना वीज खात्याचा शॉक, महिन्याचं बिल एवढ्या टक्क्यांनी वाढणार

नियमन आयोगाने दिली मंजुरी
Electricity Bill
Electricity BillDainik Gomantak
Published on
Updated on

वीज खात्याच्या प्रस्तावित वीज दरवाढीस संयुक्त वीज नियमन आयोगाने मंजुरी दिल्याने १ एप्रिलपासून नवे वीजदर लागू झाले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याचे बिल पाहिल्यानंतर ग्राहकांना या दरवाढीचा ‘शॉक’ लागेल. अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला आता हा नवा झटका बसणार आहे.

संयुक्त वीज नियमन आयोगाने 5.19 टक्के दरवाढीस मंजुरी दिली आहे. गेल्या वषर्भरात ही दुसरी वीज दरवाढ आहे. त्याचा मोठा फटका घरगुती विजेचा वापर असणाऱ्या नागरिकांना बसणार आहे. सप्टेंबर 2022vमध्ये 1.69 रुपये प्रति किलोवॅट दर ठरविला होता. शिवाय पथदीप भार म्हणून 0.08 पैसे प्रति किलोवॅट दर वाढवले होते.

Electricity Bill
Tigers Declining in Goa: चिंताजनक! गोव्यात वाघ होताहेत कमी; म्हादई, मोले अभयारण्यात वाघांच्या संख्येत घट...

उच्च दाबाची वीजही महागली

यापूर्वीची वीज दरवाढ लक्षात घेता गेल्या वर्षभरात खात्याने 5 ते 6 टक्के वीज दरवाढ केली आहे. घरगुती वीज ग्राहकांना विजेच्या वापराप्रमाणे प्रति किलोवॅट 15 ते 60 पैसे अतिरिक्त भार पडणार आहे. उच्च दाबाची वीजही महागली असून उद्योजकांनाही त्याचा फटका बसणार आहे. वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस म्हणाले की, एप्रिल 2023 पासून नव्या वीज दरवाढीप्रमाणे ग्राहकांना बिले देण्यात येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com