Goa Crime News: सेक्स स्कँडलप्रकरणी संकल्प आमोणकर यांची चार तास जबानी

कथित सेक्स स्कँडलप्रकरणी क्राईम ब्रँचने (Crime Branch) काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांच्यासह दोघांच्या जबान्या नोंदवून घेतल्या.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: माजी मंत्री व आमदार मिलिंद नाईक यांच्याविरोधातील कथित सेक्स स्कँडलप्रकरणी क्राईम ब्रँचने (Crime Branch) काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांच्यासह दोघांच्या जबान्या नोंदवून घेतल्या. आमोणकर यांची सुमारे चार तास जबानी घेतली. आवश्‍यकता भासल्यास त्यांना पुन्हा बोलवण्यात येईल, अशी माहिती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Goa Crime News
Goa Politics: 40 आमदारांपैकी सुमारे 24 आमदारांचे पक्षांतर!

या सेक्स स्कँडलप्रकरणी पीडित महिलेने संकल्प आमोणकर व इतरांविरोधात गुन्हा (Crime) दाखल केला आहे. खंडणी वसुलीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास मुरगाव पोलिस स्थानकात सुरू होता, मात्र त्यानंतर तो आता क्राईम ब्रँचकडे देण्यात आला आहे. क्राईम ब्रँचने आज आमोणकर यांना सकाळी तर लुके झाकारिस ज्यो यांना संध्‍याकाळी जबानी नोंदवण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार आमोणकर सकाळी 10:30 वाजता क्राईम ब्रँचमध्ये हजर झाले व दुपारी 2:30 वाजता निघून गेले.

दरम्यान, संकल्प आमोणकर यांनी आमदार मिलिंद नाईक (Milind Naik) यांच्याविरोधात दाखल केलेल्‍या तक्रारीची अजूनही प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती या स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यांनी सादर केलेल्‍या पुराव्‍यांची वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी सुरू आहे. अजूनही या तक्रारीशी संबंधित कोणालाही समन्स पाठवण्यात आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Goa Crime News
मनोज परब रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

आणखी तिघांची उद्या जबानी

क्राईम ब्रँचच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमोणकरांच्‍या जबानीची पडताळणी केली जाईल. तसेच त्‍यांनी दिलेली माहिती व त्यासंदर्भातील पुरावेही तपासून पाहिले जातील. आता येत्या 15 जानेवारीला निर्भय नारायण, पांडुरंग वरदकर व प्रिया वरदकर यांना जबानी देण्यासाठी बोलवण्यात आले आहे. तक्रारीत महिलेने नमूद केलेल्या व्यक्तींच्या अगोदर जबान्या नोंदवून या प्रकरणाशी संबंधित असलेल्या इतरांनाही चौकशीस बोलावले जाणार आहे.

Goa Crime News
नाईट कर्फ्यूबद्दल बोलताना गोव्याचे आरोग्यमंत्री म्हणाले....

पीडित महिलेच्‍या आरोपांचे खंडन

आपल्‍या जबानीत आमोणकर यांनी पीडित महिलेने केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. पणजी महिला पोलिस स्थानकात आमदार मिलिंद नाईक यांच्‍याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच सर्व पुरावेही सादर करण्यात आले आहेत. त्याची पडताळणी करावी अशी विनंती त्यांनी आज चौकशी अधिकाऱ्यांना केली. आपल्‍याविरोधात त्‍या महिलेने माजी मंत्र्याच्‍या दबावामुळेच खोटी तक्रार दाखल केली आहे, असेही म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com