Goa Politics: 40 आमदारांपैकी सुमारे 24 आमदारांचे पक्षांतर!

आमदारांच्या पक्षांतराच्या बाबतीत गोव्याने गेल्या पाच वर्षांत विक्रम केला आहे.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: गोवा हे जगात पर्यटन स्थळासाठी प्रसिद्ध असताना आता आमदारांच्या पक्षांतराच्या बाबतीत गोव्याने गेल्या पाच वर्षांत विक्रम केला आहे. 40 आमदारांपैकी सुमारे 24 जणांनी आतापर्यंत पक्षांतर केले असून येत्या काही दिवसांत त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशात छोटे राज्य असलेले गोवा हे राज्य या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहे.

Goa Politics
गोव्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेटमध्ये झपाट्याने वाढ

40 आमदारांची गोवा विधानसभा असूनही उत्तर व दक्षिण गोव्यातील प्रत्येकी 12 आमदारांनी भाजप सरकार असताना व निवडणूक (Goa Elections) ऐन तोंडावर आल्यावर पक्षांतराचा धडाका लावला आहे. गेल्या महिन्याभरात दहाजणांनी पक्षांतर केले आहे, तर त्यापूर्वी काँग्रेस (Congress) तसेच मगोच्या (MGP) आमदारांनी भाजपमध्ये पक्षांतर केले होते. सर्वात मोठ्या संख्येने आमदारांचे पक्षांतर हे जुलै 2019 मध्ये झाले होते. काँग्रेस आमदार व विरोधी पक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर (Babu Kavalekar) यांच्या नेतृत्वाखाली दहा आमदार फुटून भाजपवासी झाले होते. त्यांनी पक्षांतर करताना आमदारकीचा राजीनामा न देता काँग्रेस पक्षच विलीन केला होता. त्यामध्ये फिलीप नेरी रॉड्रिग्ज, जेनिफर मोन्सेरात, बाबूश मोन्सेरात, टोनी फर्नांडिस, इजिदोर फर्नांडिस, क्लाफासिओ डायस, विल्फ्रेड डिसा, फ्रान्सिस सिल्वेरा, नीळकंठ हळर्णकर यांचा समावेश होता. त्यांच्यापाठोपाठ त्यानंतर मगोचे आमदार मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर व दीपक पावस्कर यांनी मगो पक्ष विलीन करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रक्रियेला काँग्रेसने व मगोने आव्हान दिले असून त्याविरुद्धची याचिका प्रलंबित आहे व त्यावर कोणत्याही क्षणी निवाडा येण्याची शक्यता आहे.

Goa Politics
नाईट कर्फ्यूबद्दल बोलताना गोव्याचे आरोग्यमंत्री म्हणाले....

दरम्यान, 2017 साली काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आल्यानंतर विश्‍वजित राणे (Vishwajit Rane), सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे या तिघांनी आमदारकीचे राजीनामे दिले होते. काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. या तिन्ही ठिकाणी पोटनिवडणूक झाल्या होत्या व या तिन्ही जागांवर भाजपने जिंकण्यात मोठे यश मिळवले होते.

लुईझिन फालेरोंनी लावला मुहूर्त

विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस बाकी असताना राज्यात पक्षांतराला मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. काँग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो हे तृणमूलमध्ये गेल्यानंतर एकापाठोपाठ एक आमदार आपले स्थान घट्ट करण्यासाठी राजकीय वारे ज्या बाजूने वाहत आहे त्या बाजूने जाण्यास सुरवात केली. त्यानंतर काँग्रेसचे रवी नाईक यांनी भाजपमध्ये, तर भाजपच्या एलिना साल्ढाना व काँग्रेसचे आलेक्स रेजिनाल्ड यांनी तृणमूलला मिठी मारली. गोवा फॉरवर्डचे जयेश साळगावकर, अपक्ष रोहन खंवटे, अपक्ष गोविंद गावडे यांनी भाजपमध्ये, तर भाजपचे मायकल लोबो, कार्लोस आल्मेदा, प्रवीण झांट्ये, अपक्ष प्रसाद गावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com