नाईट कर्फ्यूबद्दल बोलताना गोव्याचे आरोग्यमंत्री म्हणाले....

पुढील काही दिवसात कोरोना रुग्णांमद्धे अधिक वाढ होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.
Vishwajit Rane
Vishwajit Rane Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा सध्या कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. रोज वाढत असेलेली रुग्ण संख्या राज्य सरकार आणि नागरिकांसाठी चिंतेचे कारण बनली आहे. पुढील काही दिवसात कोरोना रुग्णांमद्धे अधिक वाढ होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आतानाही आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी नाईट कर्फ्यू लदण्याच्या चर्चांना पूर्णविराम लावला. ते म्हणाले, " नाईट कर्फ्यू (Night Curfew) लावला तर लोकांनी तो काटेकोरपणे पाळला पाहिजे. अन्यथा निर्बंध लावण्यात काहीही अर्थ नाही."

Vishwajit Rane
Goa Election: गोव्यात राजकीय पक्षांचा 'डिजिटल' प्रचार सुरू

ते पुढे म्हणाले, "लोक जर निर्बंधांचे पालन करणार नसतील तर निर्बंध लावण्यात काहीच अर्थ नाही. सध्या हॉटेलमध्ये जेवयाल जाणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे. लोकांनी मास्क घातला पाहिजे. अनेक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना (Health Workers) कोरोनाची लागण होत आहे म्हणून राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने रुग्णांची काळजी घेण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

Vishwajit Rane
गोव्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेटमध्ये झपाट्याने वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान झालेल्या चर्चे बद्दल बोलताना आरोग्य मंत्री म्हणाले, "युरोपियन देशांच्या तुलनेत प्रकरणे कशी वाढतील आणि नंतर कमी होऊ लागतील यावर चर्चा झाली".

"आम्ही सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटल म्हणून राखून ठेवले आहे. लोकांमध्ये भीती पसरवू नका," ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com