Goa Job Scam: 20 लाख घेतात, अमेरिकेत नोकरीचे आश्वासन देतात; गोव्यातील तरुणांची होतेय फसवणूक, आमोणकरांनी मांडली व्यथा

Goa Foreign Job Fraud: विदेशात नोकऱ्या देण्‍यासाठी कायदेशीर केवळ 9 एजन्‍सी आहेत. त्‍यामुळे स्‍थानिक युवक–युवतींनी बोगस एजन्‍सी आणि एजंटना बळी पडू नये, असे आवाहन मुख्‍यमंत्री सावंत यांनी केले.
Sankalp Amonkar
Sankalp Amonkar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विदेशात नोकऱ्या देण्‍यासाठी राज्‍यात कायदेशीर केवळ नऊ एजन्‍सी आहेत. त्‍यामुळे स्‍थानिक युवक–युवतींनी बोगस एजन्‍सी आणि एजंटना बळी पडू नये, असे आवाहन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विधानसभा सभागृहात केले.

आमदार संकल्‍प आमोणकर यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्‍यात बेकायदेशीररीत्‍या सुरू असलेल्‍या एजन्‍सी आणि एजंट स्‍थानिक युवकांना विदेशात मोठ्या पगाराचे आश्‍वासन देऊन त्‍यांना लुटत आहेत.

अशा युवक–युवतींना व्‍हिसा मिळवून देऊन त्‍यांच्‍याकडून १५ ते २० लाख रुपये घेत आहेत. यातील बहुतांशी एजन्‍सी आणि एजंट तरुण–तरुणींना अमेरिकेत पाठवण्‍याचे आमिष दाखवतात आणि त्‍यांना लुटतात. पण, पैसे दिलेले अमेरिकेपर्यंत पोहचत नाहीत आणि एजंट त्‍यांना पुन्‍हा पैसे परत करीत नाहीत, असे आमोणकर यांनी सांगितले.

Sankalp Amonkar
Coal Scam: 'कोळसा कंपन्‍यांकडून 3 ते 4 हजार कोटींचा घोटाळा'! युरींचा घणाघात; कंपन्यांच्या प्रेमापोटी सरकार गप्‍प असल्याचा दावा

दरम्‍यान, अशा प्रकरणांमध्‍ये रोख स्वरूपात एजन्‍सी किंवा एजंटना पैसे दिले जातात. त्‍यामुळे सरकारकडे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण कमी आहे. पण, ज्‍या तक्रारी येतात त्‍यांची चौकशी करून बोगस एजन्‍सी आणि एजंटवर कारवाई केली जात आहे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले. विदेशात नोकऱ्या देणाऱ्या राज्‍यात केवळ नऊ कायदेशीर एजन्‍सी आहेत. त्‍यामुळे बोगस एजंटच्‍या जाळ्यात अडकू नये, त्‍यांना पैसे देऊ नये, असे ते म्हणाले.

Sankalp Amonkar
Goa Government Jobs: गोव्यातील सरकारी खात्‍यांत 2618 पदे रिक्त; वीज, वन, सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये सर्वाधिक पदे

मुरगावातील ३८ युवकांना फसवले

मुरगावातील ३८ युवक अशा प्रकरणांत फसलेले आहेत हे सांगताना आमोणकर यांनी एका युवकाबाबत घडलेली घटनाही सांगितली. संबंधित युवकाला अमेरिकेत पाठवण्‍याची हमी एजन्‍सीने दिली होती. त्‍याच्‍याकडून १६ लाख रुपये घेऊन त्‍याला प्रथम मुंबईला नेले. तेथून तुर्की, मॅक्‍सिकोला आणि त्‍यानंतर तिजुआना येथे अमेरिकेची सीमा ओलांडायला लावली. सीमा ओलांडताना संबंधित युवकाला पोलिसांनी पकडले. त्‍यानंतर तो युवक तेथे नऊ महिने अटकेत राहिला. त्‍यानंतर सुटून तो गोव्‍यात परतला. पण, संबंधित एजन्‍सी त्‍याला पैसे परत करीत नाही. त्‍यामुळे अशा बोगस एजन्‍सी व एजंटवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com