हर हर महादेव! सांगेत श्री पाईकदेवाची पालखी मिरवणूक उत्साहात, 15 तासांचा महाल फेरा; भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

Sanguem Shri Paikdev Palakhi: सांगे महालाचे जागृत देवस्थान श्री पाईकदेव महाराजांचा त्रैवार्षिक पालखी उत्सव यंदा अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
Sanguem Shri Paikdev Palakhi
Sanguem Shri Paikdev PalakhiDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: सांगे महालाचे जागृत देवस्थान श्री पाईकदेव महाराजांचा त्रैवार्षिक पालखी उत्सव यंदा अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळी सात वाजता श्रींची पालखी खांद्यावर घेत शेकडो अबालवृद्ध भाविक अनवाणी सहभागी झाले. ‘श्री पाईकदेव महाराज की जय’ आणि ‘हर हर महादेव’च्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

बेंडवादनाच्या दमदार ठेक्यांवर, ठिकठिकाणी काढलेल्या आकर्षक रांगोळ्या, तोरणे, पताका आणि सजावटीमुळे संपूर्ण सांगे महाल परिसरात चैतन्य आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारची सुट्टी असल्याने भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. नवस फेडण्यासाठी तसेच श्रींच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांनी गर्दी केली होती.

मार्गावर सुवासिनींनी श्रींची ओवाळणी करून स्वागत केले. मनोभावे प्रार्थना करत अनेकांनी आपल्या अडचणी आणि गाऱ्हाणी महाराजांसमोर मांडली. दर तीन वर्षांनी पालखीतून महालात फेरफटका मारताना श्री पाईकदेव महाराज भक्तांच्या समस्या ऐकून घेतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. विशेष म्हणजे सर्व धर्मीय नागरिकांनीही मोठ्या श्रद्धेने उत्सवात सहभाग घेतला.

Sanguem Shri Paikdev Palakhi
Paik Devsthan Jatrotsav: सनईच्या सूरात श्रींची पालखीतून मिरवणूक! पाईक महाराजांच्या जत्रोत्सवास प्रारंभ, शेकडो भाविकांची उपस्थिती

भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता पालखी काही ठिकाणी अक्षरशः धावत पुढे नेण्यात येत होती. संपूर्ण महालाचा फेरफटका पूर्ण करण्यासाठी सुमारे पंधरा तासांचा कालावधी लागला. या वेळी सांगे पोलिसांकडून महाराजांना सशस्त्र सलामी देण्यात आली. हा रोमांचकारी क्षण पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती, तर सोशल मीडियावरही या क्षणांचे थेट प्रक्षेपण आणि छायाचित्रण करण्यात आले.

Sanguem Shri Paikdev Palakhi
Shri Shantadurga Jatra: श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून, ती शांती, समन्वय आणि करुणेची मूर्तिमंत अनुभूती आहे..

ओवाळणीनंतर पालखी उचलून धरली जात असून भक्तिभावाने प्रत्येक घरातील मंडळी पालखीखालून जात असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. पालखीचे भोई होण्यासाठी अनेक भाविक अनवाणी फिरत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com