Sanguem: पावसाळ्‍याची बेगमी! सांगे पुरुमेंताच्‍या फेस्‍तात होतेय गर्दी; कोट्यवधींची आर्थिक उलाढाल

Sanguem Purumentachem Fest: संपूर्ण गोव्‍याबरोबरच शेजारील राज्‍यांतही प्रसिद्ध असलेल्‍या या फेस्‍ताच्‍या फेरीत कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते.
Sanguem Purumenta Fest
Purumenta FestDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: पाच दिवस चालणारे सांगेचे पुरुमेंताचे फेस्‍त काल शनिवार (१७ ते) सुरू झाले असून, खरेदीसाठी तुडुंब गर्दी होत आहे. पावसाळ्‍यातील बेगमीसाठी लागणारे साहित्य या फेरीत मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे.

संपूर्ण गोव्‍याबरोबरच शेजारील राज्‍यांतही प्रसिद्ध असलेल्‍या या फेस्‍ताच्‍या फेरीत कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्‍याने आज लोकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. परंतु अधूनमधून येणाऱ्या अवकाळी पावसामुळे विक्रेत्‍यांबरोबरच ग्राहकांचीही तारांबळ उडत आहे. पुढचे तीन दिवस तरी पर्जन्‍यराजाने कृपा करावी, अशी प्रार्थना विक्रेते करू लागले आहेत.

Sanguem Purumenta Fest
Pernem : ‘पुरुमेंता’च्या खरेदीसाठी पेडणेत ग्राहकांची गर्दी; पावसाळी तयारी

या फेस्ताच्या फेरीत सर्वाधिक स्टॉल्स आहे ते विविध प्रकारच्या रेडिमेड गार्मेंटस्‌चे. लहान मुलांपासून मोठ्यांना आकर्षण ठरावी अशा प्रकारची शेकडो दुकाने थाटण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने खरेदीसाठी महिला तसेच युवतींचा भरणा अधिक प्रमाणात दिसून येत आहे. विविध प्रकारचे ड्रेस, जीन पँट्‌स, चप्पल, बूट, छत्री, रेनकोट आणि बरेच साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Sanguem Purumenta Fest
Purumentachem Fest: प्राचीन काळापासून गोवा-कोकणातील निसर्गपूजक असणारा शेतकरी, पुरुमेंताची परंपरा

सुकी मासळी, कपडे, फर्निचर अन्‌ खूप काही

सांगेच्या या वार्षिक फेस्ताच्या फेरीत सुकी मासळी, मिरची-मसाला, अमसुले, वरवंटे, फातरी, लोखंडी तवे, कढई, कोयते, विळी, कुदळ, कुऱ्हाड आदी खूप काही आहे.लाकडी साचा असलेली आडोळी, खास गोमंतकीय कारागिरांनी बनविलेले साहित्य, प्लास्टिकच्‍या वस्‍तू, शालेय साहित्य, भांडीकुंडी, चादरी, बेडशीट, पायपुसणी, लाकडी, स्टील फर्निचर या साहित्‍यासह चणे, फुटाणे, मिठाई, थंड पेयांचे ठेले लोकांना आपल्‍याकडे आकर्षित करत आहेत.

मुख्य रस्ता केला मोकळा, पण...!

१ शिरगाव जत्रोत्‍सवात घडलेल्‍या दुर्घटनेच्‍या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने ‘संजीवनी’ फार्मसीपासून मामलेदार कचेरीसमोर लागणारे स्टॉल्स हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे फर्मान सोडले.

२ मात्र अनेक विक्रेत्‍यांना त्या बदल्यात दुसरी जागा उपलब्ध न झाल्याने त्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

३ हा नियम आठ दिवस आधीच जाहीर केला असता तर विक्रीसाठी साहित्य आणलेच नसते असे सांगून आम्‍हाला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे, अशा प्रतिक्रिया त्‍यांनी व्यक्त केल्या.

४ कोणताही अनर्थ घडू नये म्‍हणून रस्ता मोकळा केला खरा, पण ज्या ज्या ठिकाणी दुकाने लागत होती तेथे-तेथे सर्रासपणे दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जात आहेत.

५ हा आमच्‍यावर अन्‍याय नव्‍हे का? असा सवाल त्‍या विक्रेत्‍यांनी उपस्‍थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com