Pernem : ‘पुरुमेंता’च्या खरेदीसाठी पेडणेत ग्राहकांची गर्दी; पावसाळी तयारी

आठवडी बाजार गजबजला : सुकी मासळी, कडधान्यांना मागणी
Consumers While Buying Dried Fish
Consumers While Buying Dried Fish Gomantak Digital Team
Published on
Updated on

पेडणे : पेडणे येथील आठवड्याच्या बाजाराला गुरुवारी (ता.१) पावसाच्या पूर्वतयारीसाठीच्या साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या बाजारात विविध प्रकारची सुकी मासळी, कडधान्ये व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी उसळली होती.

सुक्या मासळीमध्ये सुकी सुंगटे, गालमो, भोपशी, सुके बांगडे आदी मासळीचा समावेश होता. कडधान्यांमध्ये असणारे हळसांदे, चवळी, नाचणी, उडीद, कुळीथ तर या व्यतिरिक्त विविध प्रकारचा मसाला, उकडे तांदूळ, प्लास्टिक आदी साहित्य विक्रीला आले होते. दरम्यान, कालानरुप सर्व वस्तू आता ग्राहकांना सहजपणे कोणत्याही बाजारात उपलब्ध होत आहेत.

Consumers While Buying Dried Fish
Pernem news : न्याय न मिळाल्यास आत्मदहन; संजय काले यांनी दिला इशारा

गावठी सुकी मिरची 450 रुपये किलो, हळसांदे 315 रुपये किलो, चवळी 215 ते 250 रुपये किलो, सुकी सुंगटे 300 रुपये पड, भोपशी 250 रुपये पड, टोमॅटो 20 रुपये किलो, कांदे 20 रुपये किलो, बटाटे 30 रुपये किलो, शेवग्याच्या शेंगा 20 रुपये एक जुडी, सावरबोणी केळी 50 रुपयांना पाच नग, कोथिंबीर 20 रुपये जुडी, ओली मिरची 70 रुपये किलो, पालक 10 रुपये जुडी, गाजर 75 रुपये किलो, बीट 35 रु. किलो, कारली 50 रुपये वाटा, सफरचंद 200 रुपये किलो, संत्री 150 रुपये किलो, कलिंगण 80 रुपये किलो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com