Ganesh Chaturthi 2023: पंधरा दिवस अगोदरच चतुर्थीच्‍या तयारीला लागतो, सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थी हा आमच्या चिमुगल्‍या गोव्यातील सर्वांत मोठा व लोकप्रिय सण. सर्व लोक या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात.
Ganesh Chaturthi 2023:
Ganesh Chaturthi 2023: अोगलगक उदसोलूोक
Published on
Updated on

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थी हा आमच्या चिमुगल्‍या गोव्यातील सर्वांत मोठा व लोकप्रिय सण. सर्व लोक या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. सर्व धर्माचे लोक या उत्‍सवात सहभागी होऊन चतुर्थीचा आनंद लुटतात, असे समाजकल्याण मंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

Ganesh Chaturthi 2023:
Goa Government: पंचायतींची अनास्‍था 80 कोटींपेक्षा अधिक निधी पडून

गणेश चतुर्थी अथवा इतर सणानिमित्त आम्ही सर्व फळदेसाई कुटुंबीय आमच्या कावरे येथील मूळ घरी एकत्र येतो. पंधरा दिवस अगोदरच आम्‍ही तयारीला लागतो. कामधंदा, व्यवसायानिमित्त जरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलो तरी या सणानिमित्त एकत्रित येऊन उत्सवाचा आनंद लुटतो. गणपती हा विघ्‍नहर्ता, संकटमोचक, विद्येची देवता असल्याने चतुर्थीला ‘बाप्पा’ला घरी आणून पूजा होत असल्याने हा आनंद आणखी द्विगुणित होतो, असे फळदेसाई यांनी सांगितले.

Ganesh Chaturthi 2023:
Goa Ganesh Chturthi 2023: जनतेच्‍या कल्याणासाठी शक्ती दे!

गणेशोत्‍सव हा सर्वांचाच आवडता उत्‍सव असल्‍याने सर्वत्र उत्‍साहाला उधाण आलेले असते. गावागावांत मंगलमय आणि भक्तिमय वातावरण तयार झालेले असते, असेही फळदेसाई म्‍हणाले.

आम्ही कोणत्‍याही कामाची सुरूवात करताना विघ्‍नहर्त्या श्री गणेशाची पूजा करतो. मी दररोज या देवाचे नाम:स्मरण करतो व त्‍यामुळे ते काम सिद्धीस जाते. श्री गजाननाचा आशीर्वाद असाच सर्वांवर राहू दे. श्री गणराय ही बुद्धीची देवता आहे. सर्वांनी

तिची मनोभावे सेवा केली तर आपली मनोकामना पूर्ण होते. फक्त देवावर विश्‍‍वास ठेवला पाहिजे. पंधरा दिवस अगोदरच आम्‍ही तयारीला लागतो. कामधंदा, व्यवसायानिमित्त जरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलो तरी या सणानिमित्त एकत्रित येऊन उत्सवाचा आनंद लुटतो. गणपती हा विघ्‍नहर्ता, संकटमोचक, विद्येची देवता असल्याने चतुर्थीला ‘बाप्पा’ला घरी आणून पूजा होत असल्याने हा आनंद आणखी द्विगुणित होतो,

- सुभाष फळदेसाई, समाजकल्‍याणमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com