Goa Government: पंचायतींची अनास्‍था 80 कोटींपेक्षा अधिक निधी पडून

Goa Government: पंचायतींची अनास्‍था : सासष्‍टीतील 29 पंचायतींचा निधी विनावापर
Goa Government
Goa GovernmentDainik Gomantak

Goa Government: पंचायतींकडून गावांचा विकास व्‍हावा यासाठी राज्‍य आणि केंद्रीय नियोजन मंडळांकडून निधी मिळत असला तरी त्‍या निधीचा पूर्ण वापर होत नाही हे दिसून आले आहे. हा निधी वापरण्‍यात स्‍थानिक पंचायती अनास्‍था दाखवीत आहेत. सासष्‍टी तालुक्‍याअंतर्गत येणाऱ्या 29 पंचायतींत 80 कोटींपेक्षा अधिक निधी विनावापर पडून असल्‍याचे दिसून आले आहे.

Goa Government
Truck Accident In Chorla: चोर्लाघाटात ट्रक कलंडल्यामुळे वाहतूक कोंडी

या पंचायतींनी मागच्‍या एप्रिल महिन्‍यात तालुका गटविकास अधिकाऱ्यांना जी अंदाजपत्रके सादर केली आहेत त्‍यातून ही माहिती पुढे आली आहे. किनारपट्टीतील सात पंचायतींकडून तब्‍बल २८.३० कोटी निधी वापराविना पडून आहे. तर अन्‍य 25 पंचायतीकडे प्रत्‍येकी एक कोटीपेक्षा अधिक निधी पडून आहे.

Goa Government
Goa News: पाच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या महिलेला हैदराबाद पोलिसांनी गोव्यात शोधून काढले

बेताळभाटी, सेर्नाभाटी-कोलवा, सुरावली, काना बाणावली, वार्का, करमणे व केळशी या सात पंचायतीकडे २८,३०,०९,७७८/- रुपये एवढा निधी पडून आहे. हे भाग किनारपट्टी व्‍यवस्‍थापन कायद्याच्‍या कक्षेत येत असल्‍यामुळे या भागात विकास प्रकल्‍प राबविणे अडचणीचे होते. कित्‍येकदा तांत्रिक अडचणी पुढे येतात.

त्‍यामुळे हा निधी पडून रहातो अशी माहिती केळशीचे सरपंच डिक्‍सन वाझ यांनी दिली. लोटली पंचायत सर्वांत आघाडीवर असून त्‍यांच्‍याकडे असलेला १०.३७ कोटी निधी पडून आहेे. काना-बाणावली पंचायतीकडे ७.७५ कोटी रुपये तर सेर्नाभाटी-कोलवा पंचायतीकडे ६.८० कोटी रुपये पडून आहेत. या तिन्‍ही पंचायतींचा सासष्‍टींतील मोठ्या पंचायतींमध्‍ये समावेश होत असतो.

त्‍यामानाने लहान पंचायतींची कामगिरी चांगली आहे. सर्वांत कमी निधी माकाझान या पंचायतीकडे असून त्‍यांच्‍याकडे ५९.४२ लाख रुपये पडून आहेत. ईल्‍हा द राशोल या पंचायतीकडे ८२.१४ लाख रुपये, रुमडामळ-दवर्ली पंचायतीकडे ८२.६४ लाख रुपये तर पारोडा पंचायतीकडे ९८.२६ लाख रुपये विनावापर पडून आहेत.

पंचायतींचा निधी वापराविना राहण्याचे मुख्‍य कारण म्‍हणजे, या पंचायतींकडे स्वतः:च्‍या मालकीच्‍या जमिनी फारच कमी आहेत. त्‍यामुळे दुसऱ्या मालकीच्‍या जमिनीत प्रकल्‍प राबवावेत लागतात. यासाठी त्‍या जमीन मालकांकडून ना हरकत दाखला घ्‍यावा लागतो. कित्‍येकवेळा मालक तो देत नाही, त्‍यामुळे प्रकल्‍प अडकून पडतात. कित्‍येकवेळा सरकारी अधिकाऱ्यांकडून तांत्रिक अडचणी पुढे आणल्‍यानेही प्रकल्‍प अडकून पडतात. त्‍यामुळे या प्रकल्‍पासाठी जो निधी मंजूर झाला आहे तो वापरता येत नाही. पर्यायाने हा निधी विनावापर निधी म्‍हणून पंचायतीच्‍या अंदाजपत्रकात दिसून येतो.

- डिक्‍सन वाझ, सरपंच, केळशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com