आजचे शिक्षण 'चतुरंग' ज्ञान देणारे हवे; दयानंद चावडीकर

राष्ट्रीय जलतरणचे अध्यक्ष सम्राट सर्वेश परब यांनी सम्राट फिनस्विमिंगविषयी अगदी मोजक्या शब्दांत अविस्मरणीय ज्ञान व त्यांचे फायदे सांगितले
Students
StudentsDanik Gomantak
Published on
Updated on

साखळी : आजचे शिक्षण (education) चतुरंग ज्ञान देणारे आहे. विद्यार्थ्यांसाठी (Student) केवळ एकाच प्रकारचे शिक्षण घेऊन भागणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण घेणे गरजेचे आहे, असे उद्‍गार सहाय्यक शिक्षण संचालक (कायदा विभाग) तथा मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी दयानंद चावडीकर यांनी काढले.

सम्राट क्लब साखळीतर्फे रवींद्र भवन साखळी येथे ‘सम्राट विद्यार्थी दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात चावडीकर बोलत होते. यावेळी कोषाध्यक्ष शांताराम काणेकर, सम्राट स्टुडंट फाउंडेशनचे कुष्ठा सातार्डेकर, सम्राट नम्रता नाईक, शुभदा डिचोलकर, सौरभी परब, समृद्धी गणपुले, अर्चना डिचोलकर उपस्थित होते.

Students
व्यंकटेश नाईक यांची सम्राट क्लब पेडणे टाऊनच्या अध्यक्षपदी पुनश्च: निवड

राष्ट्रीय जलतरणचे अध्यक्ष सम्राट सर्वेश परब यांनी सम्राट फिनस्विमिंगविषयी अगदी मोजक्या शब्दांत अविस्मरणीय ज्ञान व त्यांचे फायदे सांगितले. इंटरनॅशनल (International) सम्राट क्लबचे प्रतिनिधी सम्राट गौरीश गावस यांनी क्लबच्या कार्याविषयी माहिती दिली.

अध्यक्ष कृष्णा गावस यांनी सम्राट शब्दाचा अर्थ सांगताना सम्राट अशोकच्या सर्वांगसुंदर चारित्र्य संपन्न आयुष्याविषयी माहिती दिली.

Students
सम्राट क्लबच्या 'या' महान कार्यात विद्यार्थ्यांना मिळते स्फूर्ती

यंदाचे गौरविलेले सम्राट विद्यार्थी

सिया म्हातो (प्रोग्रेस हायस्कूल, साखळी), खुशी नाईक (ताराबाई दळवी हायस्कूल, पाळी), कौशल माजिक (श्री भूमिका हायस्कूल, पर्ये-सत्तरी), साची च्यारी (सरकारी माध्यमिक विद्यालय, पिसुर्ले), कृतिका खानोलकर (ज्ञानज्योती हायस्कूल, कारापूर), श्रुती पिरणकर (सरकारी माध्यमिक विद्यालय, कुडचिरे).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com