व्यंकटेश नाईक यांची सम्राट क्लब पेडणे टाऊनच्या अध्यक्षपदी पुनश्च: निवड

नवीन कार्यकारणी आणि अध्यक्ष पदाचा अधिकारग्रहण सोहळा 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पेडणे येथील हुतात्मा मनोहर पेडणेकर (Manohar Pednekar) मिडल स्कूल सभागृहात होणार आहे.
व्यंकटेश नाईक
व्यंकटेश नाईकDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: सम्राट क्लब (Club) पेडणे टाऊन ची स्थापना होऊन एक वर्ष झाले आणि या कार्यकाळात सम्राट क्लब पेडणे टाऊन ने कोरोना काळात सुध्दा वेगवेगळ्या दर्जेदार स्पर्धा भरवुन संस्कृती (Culture) संवर्धनाबरोबरच शाळेतील मुलांच्या आणि पालकांच्या डोक्यावरील ताण कमी होण्यासाठी त्याना आनंद मिळेल असे विविध उपक्रम राबविले आणि सर्व क्लब मध्ये पदार्पणातच आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला.

अल्पावधीतच सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 2020 -21 या कार्यकाळात सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1 च्या वार्षिक पुरस्कार प्रदान कार्यक्रम दर्जेदार कार्यक्रम करून विविध पुरस्कार प्राप्त केले त्याचे श्रेय अष्टपैल,बुध्दीवंत,वाक् चातुर्य, सर्वाना सांभाळुन घेणारे,शिस्तप्रिय उमदे व्यक्तीमत्व लाभलेले सम्राट क्लब पेडणे क्लब ची स्थापना पेडणेत करणारे तोरसे गावचे रहीवाशी आणि समाजसेवक (Social worker) सम्राट व्यंकटेश विश्वनाथ नाईक.

व्यंकटेश नाईक
मोरजी समुद्रकिनाऱ्यावरच्या मोकळ्या जागेत प्रदर्शित होणार 'गोल गोवा'

त्यांच्या मार्गदर्शनाचा,अनुभवाचा लाभ इतर सम्राटाना आणखी व्हावा आणि सम्राट क्लब चे धैय्य ध्यैय या वर्षी गाठुन इतिहास घडवुन आणण्यासाठी म्हणुन सम्राट क्लब पेडणे टाऊन च्या संचालकानी सम्राट व्यंकटेश विश्वनाथ नाईक यांची 2021-22 सालासाठी पुन्हा अध्यक्षपदी एकमताने निवड केली.

नवीन कार्यकारणी आणि अध्यक्ष पदाचा अधिकारग्रहण सोहळा 14 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी ठीक 3.31 ते 4.30 वाजता पेडणे येथील हुतात्मा मनोहर पेडणेकर मिडल स्कूलच्या सभागृहात होणार आहे.

या अधिकारग्रहण सोहळ्यास पेडणे पोलीस स्टेशनचे (police station) पोलीस निरीक्षक जिवबा दळवी प्रमुख पाहुणे म्हणुन आणि सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1 चे अध्यक्ष सम्राट दिपक नार्वेकर अधिकारप्रधान अधिकारी,सम्राट प्रवीण सबनीस,सचिव नुतन सभासद अधिकारी,सम्राट शशिकांत पुनाजी,विभागीय अध्यक्ष आणि सम्राट राजमोहन शेटये,आगामी अध्यक्ष सम्राट क्लब परवरी खास निमंत्रीत असतील.

व्यंकटेश नाईक
मोरजी टेंबवाडामधील पाण्याच्या समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच!

या अधिकारग्रहण कार्यक्रमात 2020-21 या सम्राट क्लब पेडणे टाऊनच्या कार्यकाळात क्लबच्या भरभराटीसाठी उल्लेखनीय असे कार्य केलेल्या क्लब सदस्यांचे सम्राट क्लब पेडणे टाऊन अध्यक्षांचे ' क्लब अध्यक्ष मान्यता पुरस्कार 2020-21 सालचे मानाचे असे चक्रवर्ती सम्राट,जनसेवक सम्राट,तेजस्वी सम्राट आणि तेजस्वीनी सम्राट प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

कार्यक्रमास मोठ्यासंखेने उपस्थित रहावे असे सम्राट क्लब पेडणे टाऊन चे कार्यक्रम संचालक रीषभ कोलवेकर यानी कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com