Goa: गोवेकरांच्या डोक्यावरचा ‘भार’ कमी होणार!

गोव्यातील (Goa) केशकर्तनालये (सलून) व बाह्य खेळांची क्रीडा संकुले (स्टेडियम) आता खुली होणार आहेत.
Goa Saloon now be open
Goa Saloon now be open Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : आता गोव्यात (Goa) ज्यांच्या डोक्यावरचे केस वाढले असतील आणि ज्यांना सलूनमध्ये जाण्याची उत्सुकता लागली असेल अशांसाठी सरकारने शुक्रवारी दिलासा देणारी गोष्ट जाहीर केली. राज्यातील केशकर्तनालये (Saloon) व बाह्य खेळांची क्रीडा संकुले (Stadium) आता खुली होणार आहेत. त्यामुळे तुमच्या डोक्यावरचा भार निश्चित कमी होईल. दुसरीकडे, संचारबंदी मात्र 12 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत असेल. नव्या निर्णयानुसार, सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत दुकाने खुली ठेवता येतील. गेल्या महिन्यापासून सरकार प्रत्येक आठवड्याला संचारबंदी आठवडाभराने वाढवून एकेक गोष्ट खुली करण्याची परवानगी देत आहे. (Saloon and outdoor sports stadium will now be open in Goa)

Goa Saloon now be open
गोव्यात संचारबंदीत 12 जुलै पर्यंत मुदतवाढ

बरे होणाऱ्यांची टक्केवारी 96.86 वर

कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.86 टक्क्यांवर पोचले आहे. गेल्या 24 तासांत कोविडमुळे 2जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी 183 नवे रुग्ण आढळले तर 285 बरे झाले. 183 पैकी केवळ 21 जण इस्पितळात आहेत. 162 जण गृह अलगीकरणात गेले आहेत. 24 तासांत 3 हजार 700 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

Goa Saloon now be open
GOA: नवीन फी व परवान्यावरून पर्यटन व्यापारी सरकारवर नाराज

2 लाखांची मदत

कोविडने मृत्यू झालेल्यांच्या वारशांना एकरकमी 2 लाख रुपयांची मदत देण्याची योजना सरकारने आज अधिसूचित केली. त्याचे अर्ज दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालये व समाजकल्याण खात्याच्या पणजी व मडगावातील कार्यालयांतच उपलब्ध केले आहेत. अर्जासोबत 10 प्रकारची विविध कागदपत्रे जोडताना योजनेस पात्र ठरणाऱ्या कुटुंबाची उत्पन्न मर्यादा वार्षिक 8 लाख रुपये ठरवण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com