गोव्यात संचारबंदीत 12 जुलै पर्यंत मुदतवाढ

गोवा सरकारने कोविड संचारबंदीस 12 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोविड संचारबंदी गोव्यामध्ये 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहे.
Curfew in Goa
Curfew in GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

गोवा सरकारने कोविड संचारबंदीस (Curfew in Goa) 12 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोविड संचारबंदी गोव्यामध्ये 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी ट्विटरवर ही माहिती दिली.

संचारबंदीच्या या काळामध्ये दुकाने दुपारी तीन ऐवजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास तसेच सलून व‌ बाह्य खेळांसाठी क्रीडा संकुले व स्टेडियम खुली करण्यास मुभा दिली आहे. सरकारने सरकारी कार्यालय सुरू ठेवण्यास, कंपन्यांचे कामकाज सुरू ठेवण्यास यापूर्वीच मुभा दिलेली आहे.

Curfew in Goa
Goa: संचारबंदी झुगारून बाजारपेठेत वर्दळ

मागच्या मुदतवाढीवेळी पंचायत व पालिकांचे बाजार खुले करण्यास सरकारने परवानगी दिली होती तसेच 50 जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळे आयोजित करण्यासही मान्यता दिली होती. पावसाळापूर्व कामे करण्यासाठी हार्डवेअरची दुकाने तसेच प्लास्टिकचे साहित्य विकणारी दुकाने ही सरकारने खुली केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com