Dhirio In Goa: वाढत्या 'धीरयो' प्रकरणांबाबत जिल्हा प्रशासन गंभीर! आयोजकांवर कारवाईचा आदेश; सासष्टीतील झुंजी थांबवण्याचे आव्हान

Dhirio In Salcete: मागच्या महिन्यात तळावली-नावेली येथे झालेल्या रेड्यांच्या झुंजीबाबत जिल्हा प्रशासनाने स्थानिक पोलिसांना सतर्क केले असतानाही पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केला होता.
Dhirio In Goa
Dhirio In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सासष्टीतील वाढत्या धीरयो प्रकरणांची दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने आता गंभीर दखल घेतली असून, जे जमीनमालक या झुंजी आयोजित करतात, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. त्याचबरोबर मामलेदाराने या मालकांची संपूर्ण माहिती माहिती द्यावी, असेही बजावले आहे.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्‌स यांनी हा आदेश जारी केला आहे. बैठकीत दक्षिण गोवा तसेच कुशावती जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संतोष देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेथ कोठवाळे व पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

काही आपत्कालीन प्रसंग घडल्यास ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर पोलिसांच्या सहकार्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, मागच्या महिन्यात तळावली-नावेली येथे झालेल्या रेड्यांच्या झुंजीबाबत जिल्हा प्रशासनाने स्थानिक पोलिसांना सतर्क केले असतानाही पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केला होता.

Dhirio In Goa
Dhirio In Goa: गोव्यात हे काय चाललंय? 4 ठिकाणी 'धीरयो' झाल्याची बातमी; सुरावलीत बैल उधळून एक जखमी झाल्याची चर्चा

पोलिस व आयोजक यांच्यात आधीच ‘सेटिंग’ होत असल्याने तालुक्यात खुलेआम धीरयो आयोजित केल्या जात असल्याचा आरोप कायदाप्रिय नागरिकांकडून होत आहे. झुंजीच्या वेळी उधळलेल्या रेड्याने शिंग भोसकून मृत्यू होण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी फातोर्डा येथील दवंडे येथे अशी घटना घडली होती. तर मागच्या वर्षी माजोर्डा येथे अशाच एका घटनेत गिरदोली येथील राजेश निस्तानी (४२) याचा मृत्यू झाला होता.

Dhirio In Goa
Goa Politics: खरी कुजबुज; मुख्‍यमंत्र्यांच्‍या मनात काय?

पोलिसांसमोर आव्हान

कायद्याने बंदी असूनही सासष्टीत खुलेआम धीरयो आयोजित केल्या जात आहेत. या आठवड्यात इस्टरच्या दिवशी (रविवार, ता. ५) सासष्टीत धीरयोंचा धुरळा उडणार असल्याची माहिती मिळाली आहे. या झुंजी थांबवण्याचे मोठे आव्हान तालुक्यातील पोलिस यंत्रणेपुढे उभे राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com