UCC and One Nation One Election : UCC, एक देश एक निवडणुकीची देशाला गरज; मुख्यमंत्री सावंत यांचे संविधान दिनी पुन्हा भाष्य

Goa CM Sawant’s speech on Constitution Day 2024: भारतात मात्र लोकशाही नांदते. अशी लोकशाही जी लोकांनी, लोकांसाठी निर्माण केलीय; CM सावंत
Goa CM Dr. Pramod Sawant
Goa CM Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

बांबोळी: देशात समान नागरी कायदा आणि एक देश, एक निवडणूक व्हायला हवी, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. ७५ व्या संविधान दिनाच्यानिमित्ताने गोवा विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा उल्लेख देखील त्यांनी यावेळी केला. कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव देखील उपस्थित होते.

"भारताचे तीन तुकडे झाले आणि पाकिस्तान, बांग्लादेश या देशांची निर्मिती झाली. पण, आज या देशांची अवस्था फार दयनीय आहे. भारतात मात्र लोकशाही नांदते. अशी लोकशाही जी लोकांनी, लोकांसाठी निर्माण केलीय. भारत लोकशाहीची जननी आहे", असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

'भारतासारख्या लोकशाहीप्रिय देशात समान नागरी कायदा लागू करायला हवा तसेच, एक देश एक निवडणूक याचा देखील अवलंब करायला हवा', असे मत सावंत यांनी व्यक्त केले.

Goa CM Dr. Pramod Sawant
Goa Crime: महिलांसाठी गोवा नॉट सेफ? 11 महिन्‍यांत सात महिलांची हत्या; लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या 100 घटना

'गोवा स्वच्छ असायला हवा, सुंदर असायला हवा आणि याची फक्त सरकारची जबाबदारी नाही. यासाठी प्रत्येकाला त्याच्या जबाबदारीचे भान असायला हवे. संविधानातील कर्तव्याची माहिती प्रत्येकाला असायला हवी आणि जबाबदारीने वागायला हवे, तरच आपण संविधान पाळतो असे म्हणता येते', असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया असे उपक्रमाच्या माध्यमातून युवांना प्राधान्य दिले जात आहे. संविधानाची मूल्य समजून घेऊन त्याचा योग्य अवलंब व्हावा यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे, असेही सावंत यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com