Goa Drug Case: बोगदावासीयांना माहीत होत्या रेश्मा, मंगेश यांच्या ‘उचापती’, अमली पदार्थप्रकरणी अटकेनंतर चर्चांना उधान!

Sadabogda Residents Stayed Silent on Wadekar Drug Case: गोवा क्राईम ब्रँचने अमली पदार्थप्रकरणी अटक केलेल्या रेश्मा व मंगेश वाडेकर या दाम्पत्याच्या काही उचापती सडा-बोगदावासीयांना माहीत होत्या. मात्र, त्यांच्याविरोधात तक्रार करूनही फायदा होणार नसल्याने कोणी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला नाही.
Sadabogda Residents Stayed Silent on Wadekar Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गोवा क्राईम ब्रँचने अमली पदार्थप्रकरणी अटक केलेल्या रेश्मा व मंगेश वाडेकर या दाम्पत्याच्या काही उचापती सडा-बोगदावासीयांना माहीत होत्या. मात्र, त्यांच्याविरोधात तक्रार करूनही फायदा होणार नसल्याने कोणी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला नाही.

बोगदा स्मशानभूमीत बांधकाम करून राहणाऱ्या या पती-पत्नीविरोधात नगरसेवक प्रजय मयेकर यांनी मुरगाव पालिकेने (Mormugao Municipality) कारवाई करावी, त्यांना तेथे कायमस्वरूपी राहू देऊ नये, अशी मागणी केली होती. तरीही त्यांच्या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे मंगळवारी जेव्हा मंगेश व रेश्मा यांना अटक करण्यात आली, तेव्हा मयेकर यांनी केलेल्या मागणीत कितपत तथ्य होते, हे उघड झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा व मंगेश हे बोगदा स्मशानभूमीतच राहतात. खरे तर मंगेश याचे वडील जयवंत वाडेकर यांना मुरगाव पालिकेने बोगदा हिंदू स्मशानभूमीची देखभाल करण्यासाठी ठेवले होते. पूर्वी ते आपले काम झाल्यावर सडा येथील आपल्या घरी जात होते. आठ-नऊ वर्षांपूर्वी जयवंत हे एकटेच तेथे राहू लागले. वयोमानानुसार त्यांच्याकडून कामे होत नसल्याने त्यांना मदत करण्यासाठी एक व्यक्ती तेथे येत होती.

Sadabogda Residents Stayed Silent on Wadekar Drug Case
Goa Drug Case: ड्रग्ज प्रकरणी नायजेरियन नागरिकाची निर्दोष सुटका, वाचा काय आहे प्रकरण?

मंगेश हा एका प्रकरणात जेलमध्ये होता. तो जेलमधून सुटल्यावर वडिलांना मदत करण्यासाठी स्मशानभूमीत येऊ लागला. तेथे काम झाल्यावर तो घरी जात असे. त्यानंतर त्याने लग्न केले. काही दिवस सडा भागात राहिल्यावर तीन-चार वर्षांपूर्वी मंगेश व रेश्मा हे स्मशानभूमीत राहण्यासाठी आले. तेथे राहताना त्यांनी आपल्या खोलीचा कायापालट करून घेतला. तेथे वातानुकूलीन यंत्र बसविले. तसेच अतिरिक्त बांधकाम करून एका व्यक्तीला भाड्याने त्या खोलीत ठेवले.

Sadabogda Residents Stayed Silent on Wadekar Drug Case
Goa Drugs Cases: गोव्यात 5 वर्षात 769 ड्रग्ज प्रकरणे! पर्यटन मोसमामुळे किरकोळ विक्रेते सक्रिय; गेल्यावर्षी सर्वाधिक प्रकरणे नोंद

स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी हालचाली होत असल्याचे कानावर आल्याने नगरसेवक मयेकर यांनी स्मशानभूमीत कोणालाही रात्रीच्यावेळी राहू देऊ नये, अशा मागणी केली. मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीतही त्यांनी प्रश्न उपस्थित करून याप्रकरणी पाठपुरावा केला. मात्र, त्यांच्या मागणीकडे कोणी लक्ष दिले नाही. याउलट त्यांचे नाव खराब करण्याचे काम विरोधकांनी सुरू केले. त्यामुळे आपणास माघार घ्यावी लागली, असे मयेकर यांनी सांगितले. आता सत्य बाहेर आल्याने लोकांच्या विविध प्रतिक्रिया ऐकण्यास मिळतात. त्या दाम्पत्याला त्यावेळी पाठिंबा देणारे आता मूग गिळून गप्प बसले आहेत. ते कोण आहेत, यासंबंधीही चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com