
पणजी: राज्यात पर्यटन मोसम सुरू झाल्याने देशभरातील पर्यटकांबरोबरच विदेशी नागरिकही गोव्यात मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. त्यामुळे ड्रग्ज माफिया व किरकोळ विक्रेतेही सक्रिय झाले आहेत. ड्रग्जचे उच्चाटन करण्याचा सरकारने विडा उचलला असला तरी ड्रग्ज प्रकरणे नोंद होण्याचे प्रमाण वाढत आहे.
गेल्या पाच वर्षात (२०२० ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत) एकूण ७६९ ड्रग्ज प्रकरणे नोंद झाली असून त्यापैकी न्यायालयात ५२ प्रकरणांचा निकाल लागला. त्यातील ४७ प्रकरणांत संशयितांना शिक्षा झाली आहे, तर ५ प्रकरणांत संशयित निर्दोष सुटले आहेत. अर्ध्याहून अधिक प्रकरणांचा तपास सुरू आहे तर उर्वरित प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.
विधानसभेतील प्रश्नाला लेखी उत्तर दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात सरासरी प्रतिवर्ष १४५ प्रकरणे नोंद होत आहेत. आतापर्यंत गेल्यावर्षी सर्वाधिक १६२ प्रकरणे नोंद झाली आहेत त्यामध्ये अंमलीपदार्थविरोधी कक्ष, जिल्हा पोलिस तसेच क्राईम ब्रँच विभागाचा समावेश आहे.
राज्यात पर्यटन मोसमात होणाऱ्या संगीत रजनी पार्ट्या तसेच रेव्ह पार्ट्यांसाठी ड्रग्ज गोव्यात रस्त्याने पोहचत असून त्यावर नजर ठेवण्यात पोलिस यंत्रणा सक्रिय असली तरी कमी पडत आहे. ड्रग्ज विक्रीमध्ये झटपट पैसा मिळत असल्याने काही हॉटेलमधील पर्यटकांना पोहचवण्यास काही हॉटेलातील कर्मचारीही सहभागी असल्याचे एका भाजप महिलेचा गोव्यात ड्रग्ज सेवनामुळे झालेल्या प्रकरणाने उघड झाले होते.
त्यामुळे पोलिसांनी आता पब्स व रेस्टॉरंट्स याच्यासह पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्या हॉटेल्सवरही नजर ठेवली आहे. ज्या ड्रग्ज प्रकरणांचे न्यायालयातील खटले निकालात निघाले आहेत, तो ड्रग्ज दरवर्षी बांबोळी येथील इन्सिनरेटरमध्ये अथवा कुंडई येथील आयडीसीच्या बायोटिक वेस्ट सोल्सुसन्स येथे समितीच्या उपस्थितीत तो जाळला जातो. यावेळी पोलिस, वैद्यकीय, औषध प्रशासन अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती असते. जोपर्यंत न्यायालयात निवाडा होत नाही, तोपर्यंत हा ड्रग्ज न्यायालयाच्या अथवा पोलिसांच्या मलखानात ठेवण्यात येतो.
दिवसरात्र पोलिस गस्त किनारपट्टी परिसरात सक्रिय
बार व रेस्टॉरंट्स तसेच शॅक्समध्ये अचानक तपासणी
पर्यटकांची अधिक उपस्थितीच्या ठिकाणी पोलिस तैनात
रात्रीच्यावेळी फिरणाऱ्या दलालांची धरपकड
संगीत नृत्य पार्ट्यांच्या ठिकाणी साध्या वेशात पोलिस
२०२१ मध्ये १२१ प्रकरणांमध्ये १५ प्रकरणांत दोषी तर ३ निर्दोष ठरले आहेत. २०२२ मध्ये १५४ पैकी ६ प्रकरणांमध्ये दोषी, २०२३ मध्ये १४० पैकी ४ प्रकरणामध्ये दोषी, २०२४ मध्ये १६२ पैकी ३ प्रकरणांमध्ये दोषी ठरले आहेत. त्यामुळे दोषी ठरण्याचे प्रमाण ९० टक्के आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.