Goa Drug Case: ड्रग्ज प्रकरणी नायजेरियन नागरिकाची निर्दोष सुटका, वाचा काय आहे प्रकरण?

Goa Court Verdict Drugs Case: 2019 मधील एका ड्रग्ज प्रकरणी नायजेरियन नागरिकाची पुराव्याअभावी अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुटका केली.
Goa Court Verdict Drugs Case
Goa Court Verdict Drugs CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Nigerian National Cleared in 2019 Goa Drugs Case Due to Lack of Evidence

पणजी: गेल्या काही दिवसांत गोवा पोलिसांच्या ड्रग्ज तस्करांविरोधात कारवाया वाढल्या आहेत. याचदरम्यान, 2019 मधील एका ड्रग्ज प्रकरणी नायजेरियन नागरिकाची अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली.

काय आहे नेमकं प्रकरण?

दरम्यान, शिवोली (Siolim) येथे छापेमारी करुन दोन नायजेरियन नागरिकांकडून पोलिसांनी ड्रग्ज जप्त केले होते. पोलिसांनी ड्रग्जसह इफेनी ओकेचुकवू ओबिन्ना आणि ओनुंचुकवू चिडीबेरे या दोन नायजेरियन तरुणांना अटक केली होती. याप्रकरणी संडे ओन्ये लकी नावाच्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, लकीने न्यायालयात आपण निर्दोष असल्याचा युक्तिवाद केला.

Goa Court Verdict Drugs Case
Goa Drug Case: अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई: इस्त्रायली नागरिकाला दुसऱ्यांदा अटक, 9 लाखांचे ड्रग्स जप्त

कोर्टाने लकीला विचारले की, संबंधित आरोपींकडे तुझ्या नावावर असणारी सीमकार्ड कशी आली. त्यावर लकीने आपल्या युक्तिवादात या प्रकरणाविषयी सविस्तररित्या सांगितले. लकीचा युक्तिवाद आणि इतर बाबी लक्षात घेऊन कोर्टाने लकीची निर्दोष सुटका केली. मात्र संबंधित आरोपींविरोधातील खटला चालू राहणार असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com