Goa Crime News: 29 ऑगस्ट रोजी नेसाय येथे जळून मृत पावलेल्या समंथा फर्नांडिस या महिलेचा मृत्यू घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप तिची आई आना मारिया डायस हिने केला असून याप्रकरणी मृतदेहाची दुसऱ्यांदा शवचिकित्सा करावी, अशी मागणी केली आहे.
आपल्या मुलीला तिच्या सासरच्या माणसांनी पेटवले असावे, असा कयास तिने व्यक्त केला आहे.
29 ऑगस्ट रोजी या महिलेचे जळाल्यामुळे निधन झाले होते. तिला सुरुवातीला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले हाेते.
त्यानंतर तिला गोमेकॉ इस्पितळात हलविण्यात आले होते. तेथे उपचार चालू असताना तिचे निधन झाले. हा मृतदेह अजूनही गोमेकॉच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.
ज्या दिवशी ही दुर्घटना घडली, त्या दिवशी रात्री ९.३० च्या दरम्यान आपल्या मुलीचा आपल्याला फोन आला होता.
त्या दिवशी तिचे तिच्या सासुशी भांडण झाले होते. त्यानंतर रात्री ‘आपण मरतेय,माझ्या लहान मुलीचा चांगला सांभाळ करा’ असे आपल्याला मुलीने सांगितले होते, असे डायस हिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
त्याच रात्री आपल्याला आपली मुलगी जळाल्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आल्याचे तिच्या सासरच्या माणसांकडून कळविण्यात आले. असे सांगून या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी तिने केली आहे.
सखोल चौकशी
समंथाची आई आना मारिया हिने तक्रारीची प्रत तिने मुख्य सचिव, गृह सचिव, पोलिस महासंचालक, पोलिस अधीक्षक, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि मायणा - कुडतरी पोलिस निरीक्षकांना पाठविले आहेत.
सासष्टीचे उपअधीक्षक संतोष देसाई यांना याबद्दल विचारले असता,हा मृत्यू लग्न होऊन दहा वर्षाच्या आत झालेला असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली जात आहे असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.