Assnora Accident: अस्नोडा येथे बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, पत्नीची प्रकृती चिंताजनक

Assnora Accident News: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर गोव्यातील अस्नोरा परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.
Assnora Accident
Assnora AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

अस्नोडा: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर गोव्यातील अस्नोरा परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. भरधाव बसने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय लक्ष्मीकांत शेटकर हे आपली पत्नी स्मृती शेटकर (३८) यांच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करत होते. अस्नोरा येथील मुख्य रस्त्यावरून जात असताना एका वेगाने येणाऱ्या बसने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की लक्ष्मीकांत यांचा मृत्यू झाला.

Assnora Accident
Goa Tourism: ‘कम टू गोवा’ एवढ्याने दर्जेदार पर्यटक गोव्यात येणार नाहीत! Social Media वरील बदनामी थांबवण्याची गरज

या अपघातात लक्ष्मीकांत यांच्या पत्नी स्मृती शेटकर या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्याला आणि अंगाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Assnora Accident
Goa Nightclub Fire: 'बर्च क्‍लब' आग प्रकरणाची धग वाढली! आणखी तिघे स्‍कॅनरखाली; अबकारी, अग्निशमनच्‍या अधिकाऱ्यांना नोटिसा

बस चालक पोलिसांच्या ताब्यात

अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला आणि लक्ष्मीकांत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com