Goa Murder: 100 रुपयांचा 'रबर मुकुट' बनला रशियन तरुणींचा काळ! खुनी आलेक्सेईच्या फोनमध्ये सापडले 100 हून अधिक महिलांचे फोटो

Russian Women Murder Goa: राज्यात दोन रशियन महिलांची गळा चिरुन हत्या झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून रोज नव-नवे खुलासे होत आहेत.
russian murder case
russian murder casedainik gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात दोन रशियन महिलांची गळा चिरुन हत्या झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून रोज नव-नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणाचा तपास करत असताना गोवा पोलिसांनी त्यांचाच एक रशियन मित्र आलेक्सेई लिओनोव्ह याला बेड्या ठोकल्या. मात्र आता तपासातून समोर आलेली हत्येची कारणे ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत. केवळ 100 रुपयांचा एक 'रबर मुकुट' (Rubber Crown) आणि काही रुपयांची उधारी परत न केल्याच्या रागातून आलेक्सेईने आपल्याच दोन मैत्रिणींची हत्या केली.

गोवा पोलिसांच्या (Goa Police) वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलांची ओळख एलेना वानीवा (37) आणि एलेना कास्थानोवा (37) अशी झाली असून त्या दोन्ही रशियन नागरिक होत्या. आरोपी आलेक्सेई हा या दोन्ही महिलांचा मित्र होता. एलेना वानीवा हिने आलेक्सेईकडून काही पैसे उधार घेतले होते, तर दुसऱ्या महिलेने म्हणजेच एलेना कास्थानोवा हिने त्याच्याकडून केवळ 100 रुपये किमतीचा एक रबर मुकुट उधार घेतला होता. वारंवार मागणी करुनही या दोघींनी त्याच्या वस्तू आणि पैसे परत न केल्यामुळे आलेक्सेई प्रचंड संतापला होता. याच रागातून त्याने 14 आणि 15 जानेवारी रोजी या दोन्ही महिलांची त्यांच्या खोलीत जाऊन हत्या केली.

russian murder case
Cyber Crime Goa: काळजी घ्या! गोव्यात सायबर भामट्यांकडून सुमारे 74 कोटींचा चुना! ज्‍येष्‍ठ नागरिक होताहेत टार्गेट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलेक्सेईने दोन्ही महिलांची हत्या उद्वेगातून केली. 14 जानेवारी रोजी आलेक्सेई मोरजी येथील एलेना वानीवा हिच्या खोलीत गेला. रात्री 11 वाजेच्या सुमारास त्यांच्यात पैशांवरुन वाद झाला आणि त्याने चाकूने तिचा गळा चिरला. त्यानंतर 15 जानेवारी रोजी तो 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या हरमल येथे गेला. तिथे त्याने एलेना कास्थानोवा हिला आधी दोरीने बांधले आणि त्यानंतर तिचीही गळा चिरुन निर्घृण हत्या केली.

russian murder case
Goa Crime: मांद्रेत धक्कादायक प्रकार, 6 जणांच्या टोळक्याकडून वृद्ध पती-पत्नीसह मुलाला मारहाण; प्रॉपर्टीच्या वादातून राडा!

त्याचवेळी, आरोपी आलेक्सेई हा मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. तपासादरम्यान त्याने दावा केला की, त्याने यापूर्वी आणखी 5 जणांची हत्या केली. मात्र, पोलिसांनी तपास केला असता त्याने नाव घेतलेली पाचही व्यक्ती जिवंत असल्याचे आढळून आले. यावरुन त्याची मानसिक स्थिती ढासळलेली असल्याचे स्पष्ट होते. यापूर्वीही त्याने गोव्यात काही पुरुषांशी मारामारी केली होती, मात्र त्यावेळी त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

russian murder case
Goa Crime: चोरीसाठी महिलेच्या जिवावर उठला चोर! थरारक घटनेनंतर मडगाव पोलिसांची मोठी कारवाई; संशयिताच्या आवळल्या मुसक्या

आरोपीचा फोन जप्त केल्यानंतर पोलिसांना त्यात 100 हून अधिक महिलांचे आणि दोन पुरुषांचे फोटो सापडले आहेत. तो लोकांशी खूप लवकर मैत्री करायचा आणि तितक्याच लवकर त्यांच्यावर चिडायचाही. सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष भेटीतून त्याने अनेक महिलांशी (Womens) ओळख वाढवली होती. सध्या आलेक्सेई पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे गोव्यातील परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com