Cyber Crime Goa: काळजी घ्या! गोव्यात सायबर भामट्यांकडून सुमारे 74 कोटींचा चुना! ज्‍येष्‍ठ नागरिक होताहेत टार्गेट

Cyber Fraud In Goa:आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड यांनी याबाबतचा प्रश्‍‍न विचारला होता. ऑनलाइन पद्धतीने लोकांची आर्थिक फसवणूक होण्‍याच्‍या प्रकरणांत दरवर्षी वाढ होत चालली आहे.
Cyber Fraud
Cyber FraudDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सायबर भामट्यांनी गेल्‍या तीन वर्षांत २९६ गोमंतकीयांना सुमारे ७४.१३ कोटी रुपयांचा गंडा घातल्‍याची माहिती मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून दिली आहे. या भामट्यांना बळी पडत असलेल्‍या ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या संख्‍येत वाढ झाल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड यांनी याबाबतचा प्रश्‍‍न विचारला होता. ऑनलाइन पद्धतीने लोकांची आर्थिक फसवणूक होण्‍याच्‍या प्रकरणांत दरवर्षी वाढ होत चालली आहे. २०२३ ते २०२५ या तीन वर्षांच्‍या काळात राज्‍यात अशी किती प्रकरणे घडली? त्‍यात नागरिकांचे किती नुकसान झाले?

यात ज्‍येष्‍ठ नागरिकांचे प्रमाण किती आहे? असे प्रकार का वाढत आहेत? आणि ते रोखण्‍यासाठी सरकारने कोणत्‍या उपाययोजना केल्‍या आहेत? असे प्रश्‍‍न आमदार रेजिनाल्‍ड यांनी विचारले होते.

त्‍यावर २०२३ ते २०२५ या तीन वर्षांच्‍या काळात सायबर भामट्यांनी २९६ जणांची सुमारे ७४.१३ कोटींची फसवणूक केल्‍याचे मुख्‍यमंत्र्यांनी म्‍हटले आहे. २०२३ मध्‍ये ६.१७ टक्‍के ज्‍येष्‍ठ नागरिकांची अशा पद्धतीने फसवणूक झाली होती.

२०२४ मध्‍ये त्‍यात वाढ झाली. यावर्षी १४.११ टक्‍के ज्‍येष्‍ठ नागरिकांची फसवणूक झाली. तर गतवर्षी १२.२१ टक्‍के ज्‍येष्‍ठ नागरिकांना सायबर भामट्यांनी चुना लावल्‍याचे त्‍यांनी नमूद केले आहे.

Cyber Fraud
Goa Cyber Crime: 1.41 कोटींचा गंडा! नागपूरच्या 23 वर्षीय 'मास्टरमाईंड'ला गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली वाळपईच्या एकाला लुटलं

जागृतीचा अभाव, विकसित होत असलेली गुन्हेगारी तंत्रे, वैयक्तिक माहितीचा गैरवापर, सहज आणि लवकर पैसे कमावण्‍याचा मोह आदींसारख्‍या कारणांमुळे सायबर गुन्ह्यांमध्‍ये वाढ होत चालली आहे. असे प्रकार रोखण्‍यासाठी पोलिसांनी विविध प्रकारच्‍या उपाययोजना केल्‍या आहेत.

याबाबत जनतेत सातत्‍याने जागृती केली जात आहे. पोलिस खात्‍यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सायबर संबंधित गुन्हे हाताळण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे आणि कौशल्य वाढवण्यासाठी त्‍यांना नियमित प्रशिक्षण दिले जात आहे.

Cyber Fraud
Cyber Fraud: 'अनन्या'च्या जाळ्यात अडकला एसबीआय क्लर्क, फेसबुकवरची एक फ्रेंड रिक्वेस्ट अन् 92 लाखांचा गंडा; काय नेमकं प्रकरण?

सायबर गुन्हेगारीच्या तपासात मदत करण्यासाठी प्रगत फॉरेन्सिक साधने आणि सॉफ्टवेअर उपलब्ध करण्‍यात आले आहे. तसेच बँक अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या जात असून, ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीच्या उपायांवर त्‍यांच्‍याशी सविस्तर चर्चा केली जात असल्‍याचेही मुख्‍यमंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com