Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 52 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप; रूपाली शंखवाळकरच्या जामीन अर्जावर पोलिसांना नोटीस

Goa Government Job Fraud Case: न्यायालयाने या प्रकरणी पणजी पोलिसांना नोटीस जारी केली असून, २६ ऑक्टोबर रोजी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
Goa Government Job Fraud Case
Government Job FraudDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून एकाच कुटुंबाला ५२ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी मुख्य संशयित अजित शंखवाळकर याची पत्नी रूपाली अजित शंखवाळकर हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणी पणजी पोलिसांना नोटीस जारी केली असून, २६ ऑक्टोबर रोजी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ताळगाव येथील रहिवासी आणि जुन्या सचिवालयामागे दुकान चालवणारा अजित शंखवाळकर याने पर्वरी येथील निवृत्त सैनिक अनिल तळेकर आणि त्यांच्या मुलांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवले होते. मनोज तळेकर याला अबकारी विभागात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने संशयिताने अबकारी आयुक्तांच्या नावे बनावट आदेशपत्र तयार करून २७ लाख रुपये उकळले.

Goa Government Job Fraud Case
Goa Politics: पार्सेकरांची भाजपमध्ये लवकरच घरवापसी? उत्पल पर्रीकरही पुनर्प्रवेशाच्या विचारात; मांद्रे-पणजीच्या राजकीय समीकरणांची चर्चा

तसेच, अनिल तळेकर यांची मुलगी मनीषा तळेकर हिला ‘उपलेखा संचालक’ पदावर नियुक्ती दिल्याचे भासवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाचे बनावट पत्र तयार करून २५ लाख रुपये घेतले. मनोज तळेकर हा नियुक्तीपत्र घेऊन अबकारी आयुक्तांच्या कार्यालयात रुजू होण्यासाठी गेला असता, ते पत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सहायक अबकारी आयुक्त संकेत साखरदांडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, पणजी पोलिसांनी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर रुपाली शंखवाळकर हिने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

Goa Government Job Fraud Case
Leopard Cat Goa: छोट्याशा तळ्याने जंगलातील दुर्मीळ पाहुण्याला आणले कॅमेऱ्यासमोर; गोव्यात बिबटमांजराचे प्रथमच चित्रीकरण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com