Zuari Bridge
Zuari BridgeDainik Gomantak

मध्यरात्री पुलाचे रेलिंग तोडून कार झुआरी नदीत कोसळली!

कारमधील प्रवाशांसाठी शोध आणि बचाव कार्य सुरू
Published on

पणजी: काल मध्यरात्री झुआरी पुलाची बाजूची रेलिंग तुटल्याने एक कार प्रवाशांसह झुआरी नदीत पडल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. अग्निशमन आणि आपत्कालीन कर्मचार्‍यांसह वेर्णा व आगशी पोलिसांकडून झुआरी नदीत शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत त्यांना कार शोधण्यात यश आलेले नाही.

(Car plunged into Zuari river by breaking bridge railing at midnight; search & rescue operation for car occupants underway)

Zuari Bridge
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ, जाणुन घ्या पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

नौदलाच्या डायव्हर्सची मदत घेण्यात येत असून रात्रीपासून शोध मोहीम सुरू आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारचे नियंत्रण सुटले आणि ती बाजूच्या रेलिंगला धडकली आणि नदीत पडली.

वृत्तानुसार कारमध्ये चार प्रवासी होते जे पर्यटक असण्याची शक्यता आहे. ही घटना मध्यरात्री 12.45 च्या वा. सुमारास घडली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांना काही लोकांनी संपर्क केला होता की त्यांच्यापैकी चार लोक बेपत्ता आहेत व त्यांचे मोबाईल फोन बंद आहेत. हो माहिती पडताळून तेच लोक आहेत का याचा शोध पोलिस घेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com