Smriti Irani : स्मृती इराणींच्या मुलीचं 'ते' हॉटेल बेकायदेशीरच

माहिती अधिकारातून धक्कादायक वास्तव समोर; इराणींच्या अडचणीत वाढ
Smriti Irani Illegal Hotel Construction in Goa
Smriti Irani Illegal Hotel Construction in GoaDainik Gomantak 

पणजी : उत्तर गोव्यातील आसगावमध्ये बांधण्यात आलेलं सिल्ली सोल्स कॅफे आणि बार बेकायदेशीर असल्याचं आता समोर आलं आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीचं हे हॉटेल असल्याची माहिती आहे. या हॉटेलच्या बांधकामासाठी कोणतीही परवानगीच घेतली नसल्याचं माहिती अधिकारातून स्पष्ट झालंय. अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी माहिती अधिकारातून आसगाव पंचायतीकडे याबाबतची माहिती मागितली होती.

आसगाव पंचायतीने दिलेल्या माहितीनुसार या हॉटेलच्या बांधकामासाठी कोणतीही पूर्वपरवानगी पंचायतीकडे घेण्यात आलेली नाही. त्यामुळे रॉड्रिग्ज यांनी आता पंचायत संचलनालयाकडे अवैध बांधकामावर कारवाईची मागणी केली आहे. आसगाव पंचायत क्षेत्रातील बोटा वाडोमध्ये सर्व्हे क्रमांक 236 मध्ये हे कथित बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलं आहे. 2019-20 मध्ये या अवैध हॉटेलचं बांधकाम सुरु झालं होतं, असा आरोप रॉड्रिग्ज यांनी केला आहे.

Smriti Irani Illegal Hotel Construction in Goa
Revolutionary Goans : राज्य सरकारकडून गोमंतकीय युवकांची फसवणूक

या हॉटेलच्या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी संबंधित खात्याकडून घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला होता. आता हे हॉटेल ज्या पंचायत क्षेत्रात येतं, त्या आसगाव पंचायतीनेही परवानगी न दिल्याचं स्पष्ट केल्यामुळे रॉड्रिग्ज यांनी पंचायत संचलनालयाकडे धाव घेत कारवाईची मागणी केली आहे. तसंच पंचायतीला स्मृती इराणी यांचं हे हॉटेल सील करण्याचे आणि बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी रॉड्रिग्ज यांनी पंचायत संचलनालयाकडे केली आहे. गोवा उत्पादन शुल्क खात्याचे आयुक्त नारायण गाड यांनी रॉड्रिग्ज यांच्या तक्रारीवरुन सिली सोल कॅफेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, ज्यात हॉटेलच्या परवान्याची वैधता सिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच यावरील सुनावणी शुक्रवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com