Revolutionary Goans Manoj Parab
Revolutionary Goans Manoj ParabDainik Gomantak

Revolutionary Goans : राज्य सरकारकडून गोमंतकीय युवकांची फसवणूक

रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या मनोज परब यांचा गंभीर आरोप
Published on

पणजी : राज्‍य सरकार राज्‍यातील बेरोजगार युवकांची फसवणूक करत आहे. कौशल्य विकासाच्‍या नावाखाली सरकार युवकांना गंडवत असल्‍याचा आरोप रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पार्टीचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी केला. पक्षाच्‍या येथील कार्यालयात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारच्‍या अनेक कामांतील भानगडींची माहिती देण्यासाठी आम्‍ही पुढील काही दिवस दररोज पत्रकार परिषद घेऊन सरकारची पोलखोल करणार असल्‍याचे परब यांनी यावेळी सांगितले.

नुकत्‍याच झालेल्‍या विधानसभा अधिवेशनात सरकारने लोकहिताचे अनेक प्रश्‍न चर्चेला येऊ दिले नाहीत. तसेच सरकार कौशल्‍य विकास उपक्रमाद्वारे राज्‍यातील बेरोजगारी कमी करणार असल्‍याचे सांगत आहे, पण कौशल्य विकास करण्यासाठी आवश्‍यक असलेली कोणतीही नवीन यंत्रणा गेल्‍या दहा वर्षांत सरकारने उभारलेली नाही, असा आरोप परब यांनी केला.

Revolutionary Goans Manoj Parab
दिव्यांगाना ‘अपंग’ उच्चारताना सावधान!

केंद्रात आणि राज्‍यात भाजपाचे सरकार सत्तेत आहे. मुख्यमंत्री आमचे डबल इंजिनचे सरकार म्‍हणून सर्वत्र ढोल पीटत आहेत. प्रत्‍यक्षात हे डबल इंजिन काही कामाचे नाही. कारण युवकांच्‍या कौशल्य विकासाकडे ना केंद्राचे लक्ष आहे ना राज्‍य सरकार गंभीर आहे. कारण सरकारने दिलेल्‍या माहितीनुसार कौशल्‍य विकास कार्यक्रमासाठी केंद्र सरकारकडून 56 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्‍यक्षात केंद्राने केवळ 10 कोटी रुपये राज्‍याला दिले, असे ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com