रॉय नाईक-एकनाथ शिंदे भेटीने फोंड्यात राजकीय खळबळ; महादेव नाईकही उपस्थित

Roy Naik Eknath Shinde Meeting: विशेष म्हणजे, रॉय नाईक यांच्यासोबत माजी आमदार महादेव नाईक हेसुद्धा शिंदे यांना मुंबईत भेटले.
Roy Naik Eknath Shinde Meeting
Roy Naik Eknath Shinde MeetingDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

फोंडा/पणजी: गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत आमदार रवी नाईक यांचे कनिष्ठ पुत्र रॉय नाईक यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्याने फोंड्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीमुळे तर्क-वितर्क व्यक्त करण्यात येत आहेत.

विशेष म्हणजे, रॉय नाईक यांच्यासोबत माजी आमदार महादेव नाईक हेसुद्धा शिंदे यांना मुंबईत भेटले. त्यामुळे येत्या काळात नवी राजकीय समीकरणे मांडली जाणार काय, अशी चर्चा सध्या फोंडा व कुशावती जिल्ह्यात सुरू झाली आहे. रॉय नाईक यांनी हल्लीच फोंडा पालिकेच्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला असून आता रॉय नाईक शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवणार की काय, अशी शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. परंतु त्यांच्या निकटवर्तीयांनी मात्र त्यावर स्पष्ट मत व्यक्त केले नाही. सध्या महाराष्ट्रात शिंदेप्रणीत शिवसेनेचा गट सर्वस्तरांवर प्रबळ आहे. आर्थिक बाबतीत हा पक्ष मजबूत आहे.

Roy Naik Eknath Shinde Meeting
Goa Sports Director Transfer: क्रीडामंत्री तवडकर आणि संचालक गावडे यांच्यातील संघर्ष विकोपाला; बदलीच्या हालचाली सुरू?

गोव्यात भाजपसोबत की सवतासुभा?

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचे सरकार आहे. त्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना सत्तेत असल्याने गोव्यात ते भाजपबरोबर राहणार की, सवतासुभा मांडणार हे स्पष्ट झालेले नाही; परंतु शिवसेनेच्या नेत्यांनी यापूर्वी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गोव्यात शिवसेना स्वबळावर लढणार, की युती करणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.