Colvale Jail: रोविनाचा जेलमध्ये नवा प्रताप! ड्रग्स प्रकरणात कोलवाळ पोलिसांकडून पुन्हा अटक

Colvale Jail Drugs Racket: शिवोली येथील २०२० मधील बहुचर्चित दुहेरी खून खटल्यात न्यायप्रविष्ट कैदी म्हणून गजाआड असलेली रोविना परेरा लोबो हिचा कोलवाळ कारागृहातील नवा प्रताप उघडकीस आला आहे.
Colvale Jail Drugs Racket
Colvale JailDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: शिवोली येथील २०२० मधील बहुचर्चित दुहेरी खून खटल्यात न्यायप्रविष्ट कैदी म्हणून गजाआड असलेली रोविना परेरा लोबो हिचा कोलवाळ कारागृहातील नवा प्रताप उघडकीस आला आहे. कारागृहातील ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी पुन्हा रोविनाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी गोवा मानव संसाधन विकास महामंडळाची महिला सुरक्षा रक्षक आशा चोडणकर हिला ड्रग्स तस्करीप्रकरणी कारागृह प्रशासनाने रंगेहात पकडले होते. ती थर्मासच्या तळाशी गांजा लपवून कारागृहात नेण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर तिच्या लॉकरमधून चरस, मोबाईल फोन आणि एटीएम कार्ड जप्त केले होते. याप्रकरणी कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून कोलवाळ पोलिसांनी आशाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने हे अमली पदार्थ कैदी रोविनासाठी नेल्याची धक्कादायक कबुली दिली.

Colvale Jail Drugs Racket
Goa BJP: प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षांना दिल्लीत सादर केला अहवाल; भाजपचे निवडणूक धोरण रविवारी

आशाला शुक्रवारी न्यायालयातून जामीन मंजूर झाला असला, तरी तिने दिलेल्या कबुलीजबाबाच्या आधारे पोलिसांनी न्यायालयात अर्ज करून रोविनाच्या अटकेची परवानगी मिळविली. न्यायालयाची मंजुरी मिळताच शनिवारी पोलिसांनी रोविनाविरुद्ध एनडीपीएस कायद्याचे कलम क्र. ६७/२०२६ अन्वये आणि भारतीय कारागृह कायदा कलम ४२ अंतर्गत नवा गुन्हा नोंदवून अटक केली. या ड्रग्सपुरवठा साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास कोलवाळ पोलिस करत आहेत.

‘माझा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही’

कारागृहातील ड्रग्स तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेली कैदी रोविना लोबो हिला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कारागृहात ड्रग्स जप्त झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास केल्यानंतर कोलवाळ पोलिसांनी रोविनाला अटक केली होती. न्यायालयातून बाहेर पडताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तिला या तस्करीबाबत प्रश्न विचारले असता, तिने सर्व आरोप फेटाळले. या प्रकरणाशी माझा अजिबात संबंध नसून काहीही माहिती नसल्याचा दावा तिने केला आहे.

Colvale Jail Drugs Racket
Gyanesh Kumar Goa Visit: मुख्य निवडणूक आयुक्त गोवा दौऱ्यावर येणार! 2 आणि 3 सप्टेंबरला दोन दिवसांचा दौरा

रोविनाची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी

१. १५ नोव्हेंबर २०२० रोजी इग्रजवाडा-शिवोली येथे राज्य हादरवून टाकणारे दुहेरी हत्याकांड घडले होते.

२. पती ज्युलिओ याच्या दोन अविवाहित वृद्ध आत्या, मार्ता क्लेमेंतिना लोबो (६४) आणि व्हेरा लोबो (६२) यांच्यासोबत रोविनाचा सतत मालमत्तेवरून वाद होत होता.

३. या वादातून आणि संपत्तीच्या हव्यासापोटी रोविनाने कर्नाटकातील एका कामगाराला (सुभान राजाबली) ३० हजार रुपयांची सुपारी देऊन हत्येचा कट रचला.

४. १५ नोव्हेंबरच्या रात्री दोघांनी दोन्ही वृद्ध आत्यांच्या डोक्यावर कोयता व धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केलीो.

५. खुनानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, पोलिसांनी काही तासांतच आसगावातील एका भाड्याच्या खोलीतून रोविना व तिच्या साथीदाराला अटक केली.

६. या प्रकरणात तिच्या पतीने तक्रार दिली होती, तर तिच्या मुलांनीही न्यायालयात साक्ष नोंदविली आहे.

७. पाच वर्षांहून अधिक काळ हत्येच्या गुन्ह्याखाली कारागृहात बंदिस्त असतानाही रोविनाने सुरक्षा रक्षकांना हाताशी धरून थेट तुरुंगातच गांजा मागविल्याने खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com