Panjim Smart City: ...तर अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत

Panjim Smart City: स्मार्ट सिटीवर गोलमेज परिषद : 31 मेपर्यंत कामे संपवण्याची मागणी
Panjim Smart City
Panjim Smart CityDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Smart City: 31 मे पूर्वी स्मार्ट सिटी प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण व्हायला हवीत. अन्यथा स्मार्ट सिटीशी संबंधित सर्व प्राधिकरणे, प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी या विषयावरील गोलमेज परिषदेतील चर्चासत्रात पॅनलच्या सदस्यांनी केली.

Panjim Smart City
PM Modi Goa Visit: पंतप्रधान मोदींच्या गोवा दौऱ्यात केवळ सरकारी कार्यक्रम; 6 प्रकल्पांचे होणार उद्‍घाटन

चेंबर ऑफ कॉमर्समध्ये झालेल्या चर्चेत पॅनलच्या सदस्यांनी स्मार्ट सिटीच्या कामात प्राधान्याचा अभाव, शासकीय अधिकारिणींमधील समन्वय नसणे, पारदर्शकता आणि जबाबदारीचा पूर्ण अभाव आहे, अशी मते मांडली.

यावेळी स्मार्ट सिटी कामाच्या अंमलबजावणीपूर्वीच्या समस्या आणि या अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि प्रकल्प मुदतीपूर्वी पूर्ण करण्यासाठी संभाव्य उपायांवर चर्चा केली. या गोलमेज चर्चासत्रात अन्वर खान, स्नेहलता पेडणेकर, मनोज काकुलो, वीरकुमार सावंत आणि सतीश प्रभावळकर हे सदस्य सहभागी झाले होते.

मनोज काकुलो म्हणाले की, या कामात माहितीचा अभाव आहे. बेशिस्त कामांमुळे लोक त्रस्त झाले आहेत. स्मार्ट सिटीच्या कामांना प्राधान्य देण्याची गरज आहे. प्रकल्पाची माहिती सार्वजनिक करावी आणि काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत काटेकोरपणे पाळावी.

संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या कामांची जबाबदारी स्वीकारून काम न केल्यास त्यांनी राजीनामा द्यावा. अन्वर खान म्हणाले की, रस्त्यांची कामे सर्वत्र सुरू असून लोकांना काय करावे, कळत नाही. अनेक अपघातही घडले आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही.

Panjim Smart City
New Law: भूरूपांतरासाठी आता कायद्यात नवी तरतूद

या कामात पारदर्शकतेचा अभाव असून, जनतेला केवळ वर्तमानपत्रांतूनच माहिती मिळते. या कामांवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि पूर्ण झालेल्या कामांची देखभाल करणे आवश्यक आहे.

वीरकुमार सावंत म्हणाले, २०१८-१९ मध्ये पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रियेशी संबंधित समस्यांवर प्रकल्प सुरू झाला, तेव्हाच चर्चा व्हायला हवी होती. सतीश प्रभावळकर म्हणाले की, लोकांची गैरसोय टाळण्यासाठी स्मार्ट सिटीची कामे ३१ मे २०२४ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com