PM Modi Goa Visit: पंतप्रधान मोदींच्या गोवा दौऱ्यात केवळ सरकारी कार्यक्रम; 6 प्रकल्पांचे होणार उद्‍घाटन

बेतुल येथील भारतीय ऊर्जा सप्ताह उद्‍घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान गोवा दौऱ्यावर येणार आहेत.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 6 रोजी मडगावच्या बसस्थानकावर ‘विकसित भारत-२०४७’अंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. शिवाय सहा प्रकल्पांचे उद्‍घाटन, पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते केली जाईल, अशी माहिती मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात पत्रकारांना दिली.

PM Narendra Modi
Goa Electricity: मयडेत वीजवाहिन्यांची होणार संयुक्त पाहणी

बेतुल येथील भारतीय ऊर्जा सप्ताह उद्‍घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान गोवा दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, त्यांची सभा होणार नाही. हे कार्यक्रम किती वाजता असतील, त्याचा तपशील पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप कळविला गेलेला नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहकाऱ्यांना पंतप्रधानांच्या दौऱ्याची माहिती दिली आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते कुंकळ्ळी येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या संकुलाचे (एनआयटी), दोनापावला येथील भारतीय जलक्रीडा संस्थेच्या गोवा कार्यालय संकुलाचे, बेती येथील नौदलाच्या महाविद्यालयाचे, कुडचडे येथील १०० टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे मडगाव येथील कार्यक्रमातूनच उद्‍घाटन करण्यात येणार आहेत.

PM Narendra Modi
Goa Student: मुलांना व्यावहारिक शिक्षण गरजेचे; श्रीपाद नाईक

शिवाय साळावली येथील १०० दशलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची, पाटो प्लाझा येथील सरकारी संकुलाच्या थ्रीडी इमारतीची आणि पणजी ते रेईश मागूस या सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मडगावातील कार्यक्रमात वन हक्क कायद्याखालील सनदांचे वितरणही अर्जदारांना करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com