Baina Crime: भाड्याच्या खोलीतलं भांडण खुनात बदललं; काठी हल्ल्यात बिहारी तरुणाने गमावला जीव

Baina Vasco Crime News: बायणा,वास्को येथे भाड्याच्या खोलीत झालेल्या भांडणात एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी मुरगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला
roommate fight murder
roommate fight murderDainik Gomantak
Published on
Updated on

मुरगाव: बायणा,वास्को येथे भाड्याच्या खोलीत झालेल्या भांडणात एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी मुरगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल कुमार सैनी (रा. बायना, मूळ रा. बिहार) याने मारहाण केलेल्या राजेश माजे (मूळ रा. बिहार) या तरुणाचा गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (GMC), बांबोळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ मे रोजी घडली होती. सैनीने बायणा येथील एका भाड्याच्या खोलीत झालेल्या भांडणादरम्यान राजेश माजेवर लाकडी काठीने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात माजेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला उपचारासाठी जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल

सुरुवातीला सैनीला भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ अंतर्गत अटक करण्यात आली होती आणि त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

roommate fight murder
Goa Crime: फोंड्यात पत्नीचा निर्घृण खून, आरोपी पती स्वत: पोलिस ठाण्यात हजर; पुढील तपास सुरू

मात्र, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान पीडित तरुणाचा मृत्यू झाल्याने, या प्रकरणात १०३ (खून) हे नवीन कलम जोडण्यात आले असून मुरगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपीला शनिवारी (१ जून) प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्याला आता आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शरीफ जॅक्स हे मुरगावचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com