Kala Academy: ‘कला अकादमी नष्ट करणाऱ्यांना माफ करु नका'; चौकशी आणि श्‍वेतपत्रिकेच्या मागणीवर आलेमाव ठाम

Opposition Leader Yuri Alemao: कला अकादमी नष्ट करण्याच्या या गुन्हेगारी कृत्यासाठी कोणालाही माफ केले जाऊ नये, असे विरोधीपक्ष नेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
Kala Academy: ‘कला अकादमी नष्ट करणाऱ्या माफ करु नका' चौकशी आणि श्‍वेतपत्रिकेच्या मागणीवर आलेमाव ठाम
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

कला अकादमी नष्ट करण्याच्या या गुन्हेगारी कृत्यासाठी कोणालाही माफ केले जाऊ नये, असे विरोधीपक्ष नेते युरी आलेमाव यांनी सांगितले. आगामी विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार आहे.

कला अकादमीत सार्वजनिक बांधकाम विभाग, कला आणि संस्कृती खात्याचे अधिकारी आणि कलाकार तसेच ध्वनी, प्रकाशयोजना आणि स्थापत्यशास्त्रातील तज्ज्ञांसमवेत केलेल्या पाहणीचा अनुभव भयानक होता,असेही ते म्हणाले.

पर्वरी येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ध्वनी अभियंता रॉजर ड्रेगो, इव्हेंट आयोजक फ्रान्सिस कुएल्हो आणि कलाकार सिसिल रॉड्रिग्स यांच्यासह पत्रकार परिषदेत बोलताना युरी आलेमाव यांनी गोव्याचे मौल्यवान वारसा स्मारक नष्ट केल्याबद्दल सार्वजनीक बांधकाम खाते आणि कला आणि संस्कृती विभागावर टीका केली.

आपण यासंबंधी सविस्तर अहवाल तयार करत असून तो मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर करून त्यावर कालबद्ध कारवाईची मागणी करणार आहे, असेही ते म्हणाले. कला अकादमीच्या दुरुस्ती आणि नूतनीकरण कामाची श्‍वेतपत्रिका आणि न्यायालयीन चौकशीची माझी मागणी अजूनही कायम आहे,असेही त्यांनी सांगितले.

Kala Academy: ‘कला अकादमी नष्ट करणाऱ्या माफ करु नका' चौकशी आणि श्‍वेतपत्रिकेच्या मागणीवर आलेमाव ठाम
Kala Academy: ‘कला अकादमी’ला अस्वच्छतेबद्दल आरोग्य विभागाकडून नोटीस

मंगळवार,९ जुलै रोजी पाहणीवेळी कला अकादमीच्या प्रत्येक कोपऱ्याची पाहणी करण्यासाठी कलाकारांना तसेच माध्यम प्रतिनिधीना प्रथमच प्रवेश मिळाला. कला अकादमीची दयनीय पाहिली आहे. निकृष्ट कामे तज्ज्ञांनी अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिली आहेत.

आज बांधकाम खात्याने ध्वनी, प्रकाशयोजना, अकॉस्टिकचे तांत्रिक आराखडे सादर केले. त्यावर रॉजर ड्रेगो, फ्रान्सिस कुएल्हो यांनी पुनरावलोकन केले. मी त्यांना मला अहवाल देण्याची विनंती केली आहे. अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे मांडणार असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

Kala Academy: ‘कला अकादमी नष्ट करणाऱ्या माफ करु नका' चौकशी आणि श्‍वेतपत्रिकेच्या मागणीवर आलेमाव ठाम
Goa Kala Academy: कला अकादमीसाठी तियात्रिस्तही आक्रमक! राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार

उपकरणांमध्ये तफावती!

सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सादर केलेल्या आराखड्यांचे पुनरावलोकन केल्यानंतर,असे आढळून आले की ऑर्डर केलेल्या उपकरणांमध्ये आणि पुरवठा करण्यात आलेल्या उपकरणांमध्ये अनेक तफावती आहेत. नवीन खरेदी केलेली अनेक उपकरणे आता कालबाह्य झाली आहेत. या सर्व बाबी काळजीपूर्वक तपासण्याची गरज आहे, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com