Goa GIDC Logo Cost: 25 लाखांच्या 'लोगो'वरून 'आप' आक्रमक; जीआयडीसीच्या कारभारातील पारदर्शकतेवर सवाल, खर्चाचा हिशेब देण्याची मागणी

Rock Mascarenhas GIDC spending: नव्या ‘लोगो’वर २५ लाख रुपये, वेबसाइटसाठी १९ कोटी रुपये व ‘इन्व्हेस्ट गोवा’ या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी ३ कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप केला.
Rock Mascarenhas GIDC spending
Goa GIDC Logo CostDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: आम आदमी पक्षाचे गोवा उपाध्यक्ष रॉक मास्कारेन्हस यांनी गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या कथित खर्चावरून भाजप सरकार व ‘जीआयडीसी’ अध्यक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्यावर टीका केली. नव्या ‘लोगो’वर २५ लाख रुपये, वेबसाइटसाठी १९ कोटी रुपये व ‘इन्व्हेस्ट गोवा’ या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी ३ कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप केला.

दरम्यान, करदात्यांच्या पैशांतून करण्यात आलेल्या या खर्चामुळे सर्वसामान्य गोमंतकीयांना काय लाभ झाला, हे सरकारने स्पष्ट करावे, असेही मास्कारेन्हस यांनी म्हटले. शेतकरी आणि लाभार्थी विविध योजनांसाठी प्रतीक्षा करत असताना अनावश्यक खर्चावर कोट्यवधी रुपये उधळले जात असल्याचा आरोप करत मास्कारेन्हस यांनी ‘जीआयडीसी’च्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी केली.

Rock Mascarenhas GIDC spending
FC Goa vs FC Arkadag: एफसी गोवाची झुंजीनंतर हार, एफसी अर्कादाग संघाचा 3-0 दणदणीत विजय

किती रोजगार निर्माण झाला?

‘जीआयडीसी’ने २५ लाखांचा ‘लोगो’ तयार करण्यासाठी थेट पिकासोलाच काम दिले होते का? असा टोला लगावत मास्कारेन्हस यांनी या खर्चातून राज्यात किती रोजगार निर्माण झाले, असा सवाल उपस्थित केला. हा कोट्यवधी रुपयांचा खर्च नेमका कोणत्या उद्देशाने करण्यातआला, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी मास्कारेन्हस यांनी यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Om Birla Goa Assembly Speech
Goa High Court SIR hearing
Bicholim Fish Market
Goa Government Spending
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com