Goa Accident News: रस्ता अपघात घटले, मृत्यू प्रमाण वाढले

Goa Accident News: डिसेंबर महिन्यात 298 अपघात; 18 बळी
Accident Cases in Goa
Accident Cases in GoaDainik Gomantak

विलास महाडिक

रस्ता अपघात रोखण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून बरेच प्रयत्न करण्यात येत आहेत, मात्र दरवर्षी वाढते अपघात चिंतेचा विषय बनत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आतापर्यंत अपघातांची संख्या 10 टक्के कमी असली तर अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या 5 टक्क्यांनी वाढली आहे.

Accident Cases in Goa
Tamnar project Tower: शेल्डे तळ्यात टॉवर नकोच!

या वर्षी डिसेंबरमध्ये 198 अपघात झाले आहेत. त्यामध्ये १५ भीषण अपघात असून 18 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे 3 दिवसांमागे दोघांचा रस्ता अपघातात मृत्यू होत आहे अशी सध्या गोव्यातील स्थिती आहे.

राज्यात 25 डिसेंबर 2023 पर्यंत 2766 अपघातांची नोंद झाली आहे. त्यामध्ये 254 भीषण अपघात होऊन २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. २२६ गंभीर अपघातात ३३६ जण जखमी झाले. ५०३ किरकोळ अपघातात ७९७ जखमी झाले. १७८३ अपघातामध्ये कोणालाही इजा झाली नाही. याच काळात गेल्या वर्षी अपघाताची संख्या २९३९ होती.

Accident Cases in Goa
Goa Politics: आगामी निवडणुकीतच होणार ‘काँग्रेसमुक्त भारत’ : भाजप

त्यात २४० भीषण अपघात होऊन २५६ जणांचा बळी गेला होता. २०७ गंभीर अपघातात २६० जण जखमी तर ५३४ किरकोळ अपघातात ७८२ जण जखमी झाले होते.१९५८ अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते.

त्यामुळे अपघाताची संख्या गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कमी असली तरी भीषण अपघात ६ टक्क्यांनी तर गंभीर अपघात ७ टक्क्यांनी वाढले आहेत. या डिसेंबर महिन्यात काल २५ तारखेपर्यंत १९८ अपघात झाले आहेत. तेच २०२२ मध्ये याच महिन्यात २१२ अपघाताची नोंद झाली आहे.

या महिन्यात १५ भीषण अपघात होऊन १८ जण ठार झाले आहेत तर ३८ गंभीर अपघातात ५१ जण जखमी झाले आहेत. याच काळात २०२२ मध्ये १० अपघातात १० जणांचा बळी गेला तर २६ गंभीर अपघातात २९ जखमी झाले होते.

अपघात प्रमाण घटले तरी मृत्यू प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी मद्यधुंद, हेल्मेट न वापरणे, सिग्नल तोडणे याविरोधात मोहीम सुरू केली तरी त्यातून यश आलेले नाही. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दुचाकीस्वारांच्या अपघातात मृत्यूचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी तर सहचालकांचे प्रमाणही ७.१४ टक्क्यांनी वाढले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com