Tamnar project Tower: शेल्डे तळ्यात टॉवर नकोच!

Tamnar project Tower: उपोषण सुरू : स्‍थानिक एकवटले; लोकांचा जीव धोक्‍यात
Tamnar Project
Tamnar Project Dainik Gomantak
Published on
Updated on

Tamnar project Tower: शेल्डे-कुडचडे येथील तळ्याच्या जागेवर तम्‍नार प्रकल्पासाठी टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी जमिनीचे खोदकाम करण्‍यात येत आहे. या कामाविरोधात स्थानिक शेतकरी प्रशांत गावस देसाई हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज त्‍यांना समस्‍त शेल्‍डेवासीयांची साथ मिळाली.

Tamnar Project
Illegal Sand Extraction: होड्या तोडण्याच्या कारवाईला विरोध

शेल्डे तळ्याजवळील जमीन पाणथळ जागा म्हणून जाहीर केली असताना तेथे हायटेन्‍शन लाईन टॉवर कोणत्या आधारावर उभारला जात आहे? असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला आहे. या टॉवरविरोधात संबंधित खात्यात अनेक तक्रारी मी दिल्या आहेत. मात्र त्याची दखल न घेता काम सुरू असल्याने आज आपल्यावर हे आंदोलन करण्याची वेळ आली, असे देसाई यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी सदर जागेचे जिल्हा पंचायत सदस्‍य सिद्धार्थ गावस देसाई यांनी सुशोभीकरण केलेले आहे. तर, ही जागा पर्यटनस्थळ म्हणून जाहीर करणार असल्याचे जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले आहे. असे असताना आता हा खटाटोप का? असा सवाल देसाई यांनी उपस्‍थित केला. जोपर्यंत हा टॉवर दुसऱ्या जागी स्थलांतर करण्यात येणार नाही, तोपर्यंत आपले उपोषण सुरूच राहणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

Tamnar Project
Yuri Alemao: हार्ड-डिस्कविना सीसीटीव्ही कसे; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

विकासाला विरोध नाही, पण विश्‍वासात घ्‍या!

विकासकामाला आमचा विरोध नाही, मात्र अशी कामे करताना आम्‍हाला विश्वासात घेतले पाहिजे असे शेल्‍डेवासीयांनी सांगितले. सदर टॉवर उभारण्यासाठी साधारणत: 200 चौरस मीटर जागा व्‍यापली जाणार आहे.

या ओलित जमिनीत हा विद्युत टॉवर येणार असल्याने लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे शेल्‍डेवासीयांनी सांगितले. तो दुसऱ्या जागी उभारावा एवढीच आमची मागणी आहे. स्थानिक आमदार नीलेश काब्राल हे पर्यावरणमंत्री असताना त्यांनी हे काम केले पाहिजे होते, पण ते केले नाही, असा आरोप लोकांनी केला.

सरकार इव्‍हेंटवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करत आहे, तर दुसरीकडे पर्यावरण विध्वंसक प्रकल्पांना मागच्या दरवाजाने परवानगी देत आहे. सरकारचा हा दुटप्‍पीपणा आता खपवून घेतला जाणार नाही.

-विशाल देसाई, शेतकरी (शेल्‍डे)

आम्हाला सरकारी अधिकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. ते फक्त हजेरी लावण्यासाठी येथे येतात. सदर जनहितविरोधी काम रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍यांनी काहीच पावले उचललेली नाहीत.

- प्रशांत गावस देसाई, शेतकरी (शेल्‍डे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com