Goa BJP
Goa BJPDainik Gomantak

Goa Politics: आगामी निवडणुकीतच होणार ‘काँग्रेसमुक्त भारत’ : भाजप

Goa Politics: गोव्यासाठी काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी आगामी लोकसभा आणि 2027 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत तेलंगणातील त्यांच्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा महत्त्वाकांक्षी दावा केला आहे. त्यास भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Published on

Goa Politics: गोव्यासाठी काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी आगामी लोकसभा आणि 2027 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत तेलंगणातील त्यांच्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा महत्त्वाकांक्षी दावा केला आहे. त्यास भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Goa BJP
Illegal Sand Extraction: होड्या तोडण्याच्या कारवाईला विरोध

भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी आगामी निवडणुकीतच ‘काँग्रेसमुक्त भारत’ निर्माण होईल असा टोला प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकातून हाणला आहे.

ठाकरे यांची विधाने वास्तवापासून फारकत घेतलेली आहेत. त्यातून काँग्रेसच्या नेतृत्वातील व्यापक विघटन दिसते. ते तेलंगणातून अलीकडेच काढून टाकल्याबद्दल निराश झाले असावेत. शिवाय गोव्याच्या राजकीय गतिमानतेबद्दल अपरिचित आहेत. त्यामुळे अशी बिनबुडाची विधाने ते गोव्यात येण्यापूर्वीच करत आहेत.

ठाकरे यांचा आशावाद छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशात का चालला नाही, याचेही आत्मपरीक्षण त्यांनी करावे, असा सल्ला वेर्णेकर यांनी दिला आहे.

लोकांचा भाजपवरील विश्वास हा भक्कम पुरावा आहे. ठाकरे यांनी निराधार दावे करण्यापेक्षा गोव्यात जवळपास नामषेश होण्‍याच्‍या मार्गावर असलेल्‍या काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यावर भर द्यावा. त्‍यांची अशी विधाने केवळ अवास्तवच नाहीत तर पक्षाच्या चेष्टेलाही पात्र आहेत, असा टोला वेर्णेकर यांनी हाणला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com