Goa Politics: 'गोमंतकीय जनतेला भाजप सरकार नकोय'! आरजीपीचा हल्लाबोल; फुटीरांना पक्षप्रवेश नको याबाबत परब ठाम

Manoj Parab: फॉरवर्ड आणि कॉंग्रेसने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत परब बोलत होते. यावेळी आमदार विरेश बोरकर, अजय खोलकर उपस्थित होते.
Manoj Parab
Manoj ParabX
Published on
Updated on

पणजी: आम्ही गोवा फॉरवर्ड आणि कॉंग्रेससोबत जी युती केली आहे ती एका नव्या सुरूवातीसाठी आहे आणि ती आम्हाला तोडायची नाही परंतु जर युतीपक्षांनी फुटीरांना जर आपल्या पक्षात प्रवेश दिला तर आम्हाला युती कायम ठेवायची का? याबाबत पुर्नविचार करावा लागेल. त्यामुळे गोवा फॉरवर्ड आणि कॉंग्रेसने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी केली.

पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत परब बोलत होते. यावेळी आमदार विरेश बोरकर, अजय खोलकर उपस्थित होते. दरम्यान, परब म्हणाले, ज्यावेळी आम्ही युती केली त्यावेळी पक्षांतर केलेल्या फुटिरांना पुन्हा पक्षप्रवेश देणार नाही, याबाबत सहमती झाली होती. परंतु आमच्या युतीतील एक पक्षाने पक्षांतर केलेल्या व्यक्तीला पक्षप्रवेश दिला आहे.

Manoj Parab
Goa Politics: खरी कुजबुज; युरीच्या स्वप्नातील ‘गोवा’ अस्तित्वात येणार ?

विरोधकांची एकजूट गरजेची!

जर आम्हाला भाजपला हरवायचे असेल तर विरोधी पक्षांना एकत्र राहावे लागेल. आमचा सर्व मतदारसंघात वावर आहे असे असताना अशावेळी युतीतील सहकाऱ्यांसोबत जागा वाटून घेणे कठीण आहे परंतु काहीवेळी अशाप्रकारचे कठीण निर्णय गोवा आणि गोमतकीय जनतेच्या हितासाठी घ्यावे लागतात. आम्ही विरोधी पक्षांनी एकत्र राहून भाजपला हरविणे गरजेचे आहे असे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले.

Manoj Parab
Panaji Politics: 'पणजीवासीय साथ देतील याची खात्री'! पर्रीकर यांचे ‘मनपा’साठी ‘एकला चलो रे’; भाजपचा अपेक्षित प्रतिसाद नसल्याने पवित्रा

लोकांना भाजप सरकार नकोय!

गोमंतकीय जनतेला भाजप सरकार नकोय. लोक कंटाळले आहेत त्यांना बदल हवा आहे. आम्ही भाजपच्या काळात गुन्हे, हिंसाचार, परप्रांतीयांचा गुंडाराज, भीती पाहिली आहे. भाजप कार्यकर्ते देखील हे मान्य करतील ही लढत भाजप विरोधात गोवा, अशी होणार असल्याचे खजिनदार अजय खोलकर यांनी सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com