Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Revolutionary Goans Party: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष नेमका कुणाचा?
 Revolutionary Goans Party
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष नेमका कुणाचा? यावरून आमदार वीरेश बोरकर आणि अजय खोलकर–विश्वेश नाईक या दोन गटांत जुंपलेली असतानाच, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा करणाऱ्या बोरकरांनी मंगळवारी प्रवीण हळर्णकर यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या शिस्तपालन समितीची स्थापना केली.

त्यानंतर काहीच तासांत हळर्णकर यांनी विश्वेश नाईक यांना नोटीस जारी करीत येत्या २९ जुलै रोजी चौकशीस उपस्थित राहण्याचे निर्देश जारी केले. पण, त्‍याआधीच विश्‍‍वेश नाईक यांनीही पक्षाला ‘रामराम’ ठोकला आहे.

 Revolutionary Goans Party
RGP Internal Dispute: खोलकरांच्‍या बडतर्फीच्‍या आदेशाला बोरकरांकडून वाटाण्‍याच्‍या अक्षता; 'मीच राष्ट्रीय अध्यक्ष!' म्हणत वीरेश बोरकरांनी ठोकला दावा

बोरकर यांनी स्थापन केलेल्या शिस्तपालन समितीत नीतेश भंडारी आणि केविन ए. कोरिया यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पक्षांतर्गत शिस्तविषयक सर्व बाबींचे निराकरण पक्षाची घटना आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना अनुसरून करणे हा या समितीच्या स्थापनेमागील उद्देश आहे.

आचारसंहितेचे उल्लंघन यांसारख्या प्रकरणांची चौकशी करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. ही समिती सर्व प्रकरणांची स्वतंत्रपणे तपासणी करेल आणि योग्य कार्यवाहीसाठी आपले निष्कर्ष व शिफारसी सक्षम प्राधिकरणाकडे सादर करेल, असे आमदार बोरकर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

 Revolutionary Goans Party
Veeresh Borkar RGP Office Dispute: आरजीपी कार्यालयात अनधिकृत प्रवेशास बंदी! आमदार वीरेश बोरकरांचे नियंत्रण; खोलकर यांच्या गटाने नोंदविला आक्षेप

विश्‍वेशच्या नोटिशीमध्ये काय

ज्या आरोपांबाबत तुम्हाला पक्षाने निलंबित केलेले होते, त्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी २९ जुलै रोजी सकाळी १० वाजता स्वतः, अधिकृत वकील अथवा प्रतिनिधीमार्फत घर क्र. ७६४/२, मालवाडा, आगाशी, तिसवाडी, गोवा येथे होणाऱ्या सुनावणीसाठी उपस्थित राहा. पुरेशा कारणाशिवाय सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास तुम्ही अपयशी ठरल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे प्रकरणाची पुढील कार्यवाही करण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार समितीला असेल. योग्य निर्णय घेण्यापूर्वी समिती तुमची बाजू ऐकून घेईल’’, असे पक्षाने विश्‍‍वेश नाईक यांना जारी केलेल्‍या नोटिशीत म्‍हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com